AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
रेशन कार्ड संबंधित आता या सुविधा मिळणार ऑनलाइन!
समाचारन्यूज १८ लोकमत
रेशन कार्ड संबंधित आता या सुविधा मिळणार ऑनलाइन!
➡️रेशन कार्डद्वारे सरकार आपल्या राज्यातील गरजू, गरीब कुटुंबियांना धान्य देते. अनेकदा रेशन कार्ड अपडेट करण्यासाठी किंवा डुप्लिकेट कॉपी बनवण्यासाठी किंवा नव्या रेशन कार्डसाठी अर्ज करताना समस्या येतात. अशात सरकार आपल्या डिजीटल इंडिया अभियानांतर्गत समस्या सोडवत आहे. ➡️तुम्ही रेशन कार्डसंबंधी सेवांसाठी तुमच्या जवळच्या कॉमन सर्विस सेंटरमध्ये माहिती घेऊ शकता. याबाबत डिजीटल इंडियाने एका ट्विटद्वारे माहिती दिली आहे. कॉमन सर्विस सेंटर सुविधाने इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागासोबत सामंजस्य करार केला आहे. ➡️देशभरातील ३.७० लाख CSC मार्फत रेशन कार्ड सेवा उपलब्ध करुन दिली जाईल. या भागीदारीचा देशभरातील २३.६४ कोटीहून अधिक रेशन कार्डधारकांना फायदा होईल. याअंतर्गत कोणत्या सेवा मिळणार - - कॉमन सर्विस सेंटरद्वारे रेशन कार्डचे तपशील अपडेट केले जाऊ शकतात. - इथे आधार सीडिंगही करता येईल. - रेशन कार्डची डुप्लिकेट प्रिंटही काढता येते. - रेशन कार्डच्या उपलब्धतेबाबत माहिती करुन घेऊ शकता. - रेशन कार्डसंबंधी तक्रारी कॉमन सर्विस सेंटरद्वारे करू शकता. - रेशन कार्ड हरवल्यास नव्या रेशन कार्डसाठी अर्जही करू शकता. ➡️तीन प्रकारचे रेशन कार्ड असतात. गरीबी रेषेच्या वरील लोकांसाठी APL, गरीबी रेषेच्या खालील लोकांसाठी BLP आणि सर्वात अतिशय गरीबांसाठी अंत्योदय असे कार्ड असतात. ही कॅटेगरी व्यक्तीच्या वार्षिक उत्पन्नावर ठरते. ➡️भारतीय नागरिकत्व असणारा प्रत्येक व्यक्ती रेशन कार्डसाठी अर्ज करू शकतो. १८ ​वर्षांखालील मुलांचं नाव आई-वडिलांच्या नावे जोडलं जातं. १८ वर्षाहून अधिक वयोगटातील व्यक्ती रेशन कार्डसाठी अप्लाज करू शकते. संदर्भ:-न्यूज १८ लोकमत, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
35
5