AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
रेशन कार्डधारकांसाठी नोव्हेंबरपर्यंत मोफत धान्य!
समाचारलोकमत
रेशन कार्डधारकांसाठी नोव्हेंबरपर्यंत मोफत धान्य!
➡️रेशन कार्ड धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. तुमच्याकडेही रेशनकार्ड असल्यास तुम्हाला मोफत धान्याशिवाय इतरही फायदे मिळतात. सध्या श्रीमंत किंवा गरीब सर्वांसाठी रेशन कार्ड हे एक अत्यावश्यक कार्ड आहे.सरकारने पुढील 4 महिने म्हणजेच नोव्हेंबरपर्यंत गरीबांना मोफत धान्य मिळेल अशी घोषणा केली होती. त्यानुसार रेशन कार्डद्वारे दरमहा 5 किलो धान्य नागरिकांना मिळू शकते. रेशन कार्डचे फायदे... ➡️रेशन कार्डचा उपयोग केवळ धान्य मिळवण्यासाठीच होत नाही. याशिवाय याच्या अनेक सुविधा मिळतात. एक ओळखपत्र म्हणूनही रेशन कार्ड उपयुक्त आहे.गॅस सिलिंडर घ्यायचा असेल तरी रेशन कार्डची आवश्यकता असते. रेशनकार्डसाठी करा ऑनलाइन अर्ज ... ➡️ यासाठी सर्वात आधी तुम्ही राज्याच्या अधिकृत वेबसाइटवर जा. ➡️ तुम्ही जर महाराष्ट्राचे रहिवासी असाल तर mahafood.gov.in या वेबसाइटवरून अर्ज करू शकता. ➡️ या वेबसाइटवर Apply online for ration card या लिंकवर क्लिक करा. ➡️ आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, हेल्थ कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादी रेशनकार्ड मिळविण्यासाठी आयडी प्रूफ म्हणून देता येईल. ➡️ रेशनकार्डसाठी अर्ज फी 05 ते 45 रुपयापर्यंत आहे. ➡️ अर्ज भरल्यानंतर फी भरा आणि अर्ज सबमिट करा. ➡️ फील्ड व्हेरिफिकेशननंतर तुमचा अर्ज योग्य आढळल्यास तुमचे रेशन कार्ड तयार होईल. कोणती कागदपत्रे आवश्यक? आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, शासनाने दिलेली कोणतीही ओळखपत्र, हेल्थ कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स रेशन कार्ड बनविण्यासाठी आयडी पुरावा म्हणून देता येईल. या व्यतिरिक्त, पॅन कार्ड, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, विजेचे बिल, गॅस कनेक्शन बुक, टेलिफोन बिल, बँक स्टेटमेंट किंवा पासबुक, भाडे कराराची कागदपत्रेसुद्धा पत्त्याच्या पुरावा म्हणून आवश्यक असतील. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- लोकमत, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
24
2
इतर लेख