AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
रेशनचे अनुदान नाकारायाचे असेल तर सरकारने आणली नवीन योजना!
कृषि वार्तासकाळ
रेशनचे अनुदान नाकारायाचे असेल तर सरकारने आणली नवीन योजना!
👉सिलिंडरचे अनुदान परत करण्याच्या (गिव्ह इट अप) योजनेपाठोपाठ आता राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील कार्डधारकांसाठी ही योजना केंद्र व राज्य सरकारने सुरू केली आहे. 👉सवलतीच्या दराने मिळणारे अन्नधान्य नको असेल, तर या योजनेतून ‘स्वेच्छे’ने बाहेर पडा, अशी योजना सुरू करण्यात आली आहे. 👉त्यासाठी राज्य शासनाने सवलतीच्या दराने अन्नधान्याचा लाभ घेण्याची आवश्‍यकता नसलेल्यांना अन्नधान्य नाकारण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. 👉राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत ज्या व्यक्तींचे वार्षिक उत्पन्न ५९ हजार हजार रुपये इतके आहेत. 👉अशा लाभार्थ्यांना अन्नसुरक्षा कायद्याने दोन रुपये गहू आणि तीन रुपये किलो तांदूळ दिला जातो. परंतु ज्यांचे उत्पन्न आता वाढलेले आहे. 👉अशा लाभार्थ्यांनी स्वेच्छेने सवलतीच्या दराने अन्नधान्य घेण्याच्या योजनेतून बाहेर पडण्याची तयारी दर्शविली तर हा लाभ अल्प उत्पन्न गटातील कुटुंबांना देणे शक्‍य होणार आहे. तसेच लाभार्थ्यांनी या योजनेमधून बाहेर पडले तर शासनावर पडणारा आर्थिक भार कमी होणार आहे. 👉या सर्व बाबी विचारात घेता केंद्र शासनातर्फे घरगुती वापराच्या गॅसवर अनुदानातून बाहेर पडा अर्थात गिव्ह इट अप ही योजना सुरू केली आहे. 👉त्याच धर्तीवर राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेसाठी ती राबविण्यात येत आहे. यासाठी परिमंडळ कार्यालयामध्ये अर्ज करावा लागणार आहे, असे अन्नधान्य वितरण अधिकारी अस्मिता मोरे यांनी सांगितले. संदर्भ - सकाळ, यासारख्या अधिक महत्वाच्या व कृषी विषयक घडामोडी जाणून घेत रहा व माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
47
8
इतर लेख