AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
 रेशनकार्ड वरील मोबाइल नंबर त्वरित अपडेट करा!
समाचारसकाळ
रेशनकार्ड वरील मोबाइल नंबर त्वरित अपडेट करा!
➡️ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रेशनकार्ड वरील मोबाईल नंबर बदलण्याचे अपडेट आले आहे. रेशनकार्ड मधील मोबाईल नंबर तुम्ही आता सहज अपडेट करू शकता. रेशनकार्डमध्ये जुना मोबाईल क्रमांक टाकला असेल तर तुम्हाला रेशनशी संबंधित अपडेट मिळू शकणार नाहीत. त्यामुळे ग्राहकांनो त्वरित मोबाईल नंबर अपडेट करा. ➡️रेशनकार्डमध्ये मोबाईल नंबर अत्यंत गरजेचा आहे. चुकीचा टाकलेला किंवा तुम्हाला बदलायचा आहे तो मोबाईल नंबर कसा चेंज करायचा? याविषयी सविस्तर माहिती खालील प्रमाणे पहा.. रेशन कार्डमध्ये मोबाईल नंबर असा अपडेट करा. 1) सुरवातीला https://nfs.delhi.gov.in/Citizen/UpdateMobileNumber.aspx या साइट वर जा. 2) पुढे एक पेज उघडेल. तिथे तुम्हाला Update Your Registered Mobile Number असे लिहिलेले दिसेल. 3) पुढे खाली दिलेल्या कॉलममध्ये तुमची माहिती भरा. 4) पहिल्या कॉलममध्ये, Aadhaar Number of Head of Household/NFS ID असे लिहा. 5) व दुसऱ्या कॉलममध्ये Ration Card No. लिहा. 6) तसेच तिसर्‍या कॉलममध्ये घरप्रमुखाचे नाव लिहा. 7) आणि शेवटच्या कॉलममध्ये तुम्हाला हवा असलेला मोबाईल नंबर टाका व सेव्ह करा. 8) आता तुमचा मोबाईल नंबर अपडेट होईल. संदर्भ:- सकाळ, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
49
18
इतर लेख