समाचारAgrostar
रेशनकार्ड काढता येणार ऑनलाइन पद्धतीने
👉रेशन कार्ड काढायचे म्हंटले कि लोकांना सरकारी कार्यालयाच्या भरपूर फेऱ्या माराव्या लागतात. त्यातसुद्धा एजंटांना पैसे द्यावे लागतात, तेव्हा कुठे रेशन कार्ड मिळते.
👉यामुळेच रेशन कार्यालयांमधून एजंटांनी एक व्यवसाय उभा केला आहे.आता रेशन कार्ड ऑनलाइन आणि नि:शुल्क उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामुळे सामान्य लोकांचा त्रास कमी होणार आहे.
👉रेशनकार्ड साठी राज्यातील अनेक तहसील व परिमंडळ कार्यालयांमध्ये एजंटांचा सुळसुळाट होता.यामुळे सामान्यांना अवघ्या वीस रुपयांत मिळणाऱ्या रेशन कार्डासाठी दोन हजार रुपये मोजावे लागत होते. मात्र आता हे सर्व बंद होणार आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या शासन निर्णयानुसार आता सामान्य लोकांना ऑनलाइन आणि नि:शुल्क रेशन कार्ड काढता येणार आहे.
👉रेशनकार्ड साठी ऑनलाइन अर्ज केल्यानंतर त्याबाबतची माहिती संबंधित जिल्हा पुरवठा अधिकारी किंवा अन्नधान्य वितरण अधिकारी यांच्याकडे जमा होणार आहे. यामध्ये रेशनकार्ड साठी अर्ज करणारा अर्जदार नेमका कुठल्या वर्गातील आहे, यावरून त्याचे रेशन कार्ड किती दिवसांत मिळेल हे ठरणार आहे. अर्जदार अंत्योदय योजनेतील किंवा राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील असल्यास पूर्वीप्रमाणेच रेशन अधिकारी त्याच्या कुटुंबाचा सर्व्हे करणार आहेत.
👉अंत्योदय योजनेतील किंवा राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेमधील रेशन कार्ड देताना २० दिवसांची मुदत लागणार आहे. तर पांढऱ्या रेशन कार्डासाठी सात दिवस लागणार आहेत. रेशन कार्ड एकदा मान्य झाले की, ते ऑनलाइनच डाउनलोड करता येईल. कार्ड कोणत्या दुकानदाराकडे देण्यात आले आहे याचा उल्लेखही यामध्ये करण्यात येणार आहे.
👉संदर्भ:- Agrostar
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.