AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
रेशनकार्डशिवाय पुढचा हप्ता मिळणार नाही, नवीन नियम बदल!
समाचार न्यूज १८ लोकमत
रेशनकार्डशिवाय पुढचा हप्ता मिळणार नाही, नवीन नियम बदल!
➡️ पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेत होणारे घोटाळे रोखण्यासाठी सरकारने काही नियम बदलले आहेत. आता या योजनेच्या नोंदणीसाठी रेशन कार्ड अनिवार्य करण्यात आलं आहे. ➡️ रेशनकार्ड क्रमांक योजनेच्या पोर्टलवर दाखल केल्यानंतरच शेतकरी पती, पत्नी किंवा त्या कुटुंबातल्या कोणत्याही एका सदस्याला पीएम शेतकरी सन्मान निधीचा लाभ मिळू शकेल. ➡️ या योजनेअंतर्गत नवीन नोंदणी करण्यासाठी रेशनकार्ड क्रमांक देणं बंधनकारक असेल. याशिवाय कागदपत्राची सॉफ्ट कॉपी तयार करून पोर्टलवर अपलोडदेखील करावी लागेल. या कागदपत्रांची आवश्यकता ➡️ पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत पहिल्यांदा नोंदणी करण्यासाठी अर्जदाराला रेशनकार्ड क्रमांक अपलोड करावा लागेल. ➡️ याशिवाय रेशनकार्डची पीडीएफदेखील अपलोड करावी लागणार आहे. तसंच आता सात-बारा उतारा, आधार कार्ड, बँक पासबुक आणि घोषणापत्राची हार्ड कॉपी जमा करण्याची आवश्यकता नसेल. ➡️ या कागदपत्रांची पीडीएफ फाइल तयार करून पोर्टलवर अपलोड करावी लागेल. यामुळे नोंदणी करणं पूर्वीपेक्षा सोपं होणार असून, शेतकऱ्यांचा वेळ वाचेल. संदर्भ:- न्यूज १८ लोकमत, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
77
16
इतर लेख