AgroStar
रेशनकार्डमधून नाव कापलं गेलंय ? मग त्वरित करा काम !
समाचारAgrostar
रेशनकार्डमधून नाव कापलं गेलंय ? मग त्वरित करा काम !
➡️केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार, दोन्ही सरकार लोकांसाठी अनेक फायदेशीर आणि कल्याणकारी योजना राबवत असतात. या योजना अशा लोकांसाठी चालवल्या जातात, ज्यांना खरोखरच मदतीची गरज आहे. त्यात प्रामुख्याने आरोग्य, शिक्षण, विमा अशा अनेक योजनांचा समावेश आहे. अशीच एक योजना म्हणजे रेशन कार्ड योजना होय. या योजनेअंतर्गत लोकांना शिधापत्रिका बनवून स्वस्त रेशन दिले जाते. कोरोनाच्या काळातही अनेक लोकांना शिधापत्रिकेच्या माध्यमातून मोफत रेशन दिले जात होतं. परंतु असं असलं तरी अनेक वेळा रेशनकार्डमधून लोकांचं नाव कापलं जातं किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्याचे नाव वजा केल्याचं दिसून येतं. त्यामुळे जर तुमचे नाव रेशनकार्डमधून वजा झालं असेल तर ते पुन्हा कसं जोडता येईल ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 1- जर काही कारणास्तव तुमचं नाव शिधापत्रिकेतून वजा झालं असेल तर तुम्ही ते जोडू शकता. यासाठी तुम्हाला फक्त अधिकृत वेबसाइट https://nfsa.gov.in/Default.aspx वर जावं लागेल आणि येथे 'रेशन कार्ड' या पर्यायावर क्लिक करावे लागेल. 2- यानंतर तुम्हाला 'Ration Card Details On State Portals' वर क्लिक करावे लागेल. आता येथे तुमच्या राज्याचे नाव, जिल्हा, ब्लॉक आणि पंचायतीचे नाव निवडा. 3- त्यानंतर तुमचे रेशन दुकान, दुकानदाराचे नाव आणि शिधापत्रिकेचा प्रकार निवडा. त्यानंतर तुमच्यासमोर एक यादी येईल, ज्यामध्ये कार्डधारकांची नावे असतील. तुमचे नाव यादीतून काढले गेले आहे की नाही हे येथे तुम्हाला कळेल. 4- आता जर तुम्हाला दिसले की तुमचे नाव येथील यादीतून वगळले आहे, तर तुम्हाला ते जोडण्यासाठी तुमच्या जवळच्या अन्न पुरवठा विभागात जावे लागेल. 5- मग येथे तुम्हाला एक फॉर्म भरावा लागेल आणि काही कागदपत्रे सबमिट करावी लागतील. त्यानंतर पडताळणी होईल आणि सुमारे 2 आठवड्यांनंतर तुमचे नाव शिधापत्रिकेत जोडले जाईल. ➡️संदर्भ: Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
15
4
इतर लेख