AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
रेल्वेकडून हजारो जागांसाठी भरती!
नोकरीन्यूज १८ लोकमत
रेल्वेकडून हजारो जागांसाठी भरती!
➡️पश्चिम-मध्य रेल्वेच्या भरती सेलनं अॅप्रेंटिस पदांसाठी रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. इयत्ता १० वी उत्तीर्ण उमेदवार कोणतीही परीक्षा न देता ही नोकरी मिळवू शकतो. या प्रक्रियेतून अॅप्रेंटिसच्या २२२६ जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी नोंदणी प्रक्रिया ११ ऑक्टोबरपासून सुरू होत असून, अर्ज करण्यासाठी ११ नोव्हेंबरपर्यंत मुदत असेल. ➡️याशिवाय, रेल्वे भरती सेलकडून पूर्व विभागातल्या अॅप्रेंटिस पदांवर मोठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. या प्रक्रियेतून ३३६६ पदं भरली जाणार आहेत. या पदांच्या भरतीसाठी ८ ऑक्टोबर अर्जप्रक्रिया सुरू झाली आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवारांना आरसीसीच्या www. rrcer.com या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइनअर्ज करावा लागणार आहे. या पदांसाठीची अर्ज प्रक्रिया ३ नोव्हेंबर २०२१ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुरू राहील. फी जमा करण्याची अंतिम मुदत हीच असेल. यासाठीची गुणवत्ता यादी १८ नोव्हेंबर २०२१ रोजी घोषित करण्यात येईल. ➡️पश्चिम-मध्य रेल्वे विभागातल्या अॅप्रेंटिस पदासाठी इच्छुक उमेदवारांनी wcr.indianrailways.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन नोंदणी करावी. या पदांकरिता इच्छुक उमेदवारांसाठी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली असून, उमेदवाराचं वय १५ ते २४ वर्षांदरम्यान असावं. तसंच इच्छुक उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून इयत्ता १० वी किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण झालेला असावा किंवा त्यानं समकक्ष परीक्षेत उत्तीर्ण असल्याचं प्रमाणपत्र मिळवलेलं असावं. याशिवाय त्याच्याकडे एनसीव्हीटी (NCVT) किंवा एससीव्हीटीकडून (SCVT) मिळालेलं राष्ट्रीय व्यापार प्रमाणपत्रही असावं. ➡️नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही भरती प्रक्रिया एक संधी असून, पात्र उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:-न्यूज १८ लोकमत, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
39
29
इतर लेख