AgroStar
१०० रूपयांत घ्या पोस्ट ऑफिस च्या 'या' विशेष स्कीमचा लाभ!
कृषी वार्तालोकमत
१०० रूपयांत घ्या पोस्ट ऑफिस च्या 'या' विशेष स्कीमचा लाभ!
➡️ जेव्हा केव्हा गुंतवणूकीचा प्रश्न येतो तेव्हा मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदार पोस्ट ऑफिसच्या स्कीम्सना पसंती देत असतात. मोठ्या प्रमाणात लोक आपला पैसा त्या स्कीम्समध्ये गुंतवताना दिसतात. ➡️ दरम्यान, पोस्ट ऑफिसची आरडी आजही मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहेत. याचं मुख्य कारण म्हणजे पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवलेला पैसा हा पूर्णपणे सुरक्षित असतो. पोस्ट ऑफिसची आरडी स्कीम काय आहे ते पाहू. ➡️ पोस्ट ऑफिसमधील आरडी ही एक सरकारी स्कीम आहे. त्यामुळे या ठिकाणी गुंतवलेला पैसा हा पूर्णपणे सुरक्षित आहे. ➡️ पोस्ट खात्याच्या आरडी स्कीममध्ये गुंतवणूकदारांना ५.८ टक्के व्याज देण्यात येतं. ज्याचं तिमाहीत कंमाऊंडींग होतं. परंतु जर वेळेत पैसे भरले नाहीत, तर त्यावर दंडही आकारला जातो. ➡️ कोणताही भारतीय नागरिक केवळ १०० रूपये भरून पोस्ट खात्याची आरडी सुरू करू शकतो. केवळ याचे हप्ते भरताना तारखेची काळजी घेणं आवश्यक आहे. ➡️ जर तुम्ही महिन्याच्या पहिल्या १५ दिवसांत खातं उघडलं असेल तर तुम्हाला तुमचा हप्ता पहिल्या १५ दिवसांतच जमा करावा लागेल. ➡️ दुसरीकडे तुम्ही अखेरच्या १५ दिवसांत अकाऊंट सुरू केलं असेल तर तुम्हाला हप्ता पुढील १५ दिवसांत जमा करावा लागेल. ➡️ जर तुम्ही एखाद्या महिन्यात हप्ता जमा करू शकला नाहीत, तर तुम्हाला दंड भरावा लागेल. प्रत्येक १०० रूपयांवर तुमच्याकडून १ रूपया दंड आकारला जाईल. ➡️ जर तुम्ही वेळेत पैसे भरत नसाल, तर तुमचा अकाऊंट बंदही केला जाऊ शकतो. या आरडीची विशेष बाब म्हणजे तुम्हाला याव कर्जही घेता येऊ शकेल. ➡️ ही आरडी तुम्ही प्रीमॅच्युअर असतानाही बंद करू शकता. परंतु अशा स्थितीत तुन्हाला सेव्हिंग अकाऊंटवर मिळणारं व्याजच देण्यात येईल. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- लोकमत, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
14
6
इतर लेख