३० रुपये गुंतवून व्हा श्रीमंत...💸
कृषि वार्ताकृषी जागरण
३० रुपये गुंतवून व्हा श्रीमंत...💸
⏩ नोकरी असो किंवा बिझनेस असो प्रत्येकाला पैसा कमवून श्रीमंत होण्याची इच्छा असते. काही लोक अथक प्रयत्नांनी पैसा कमवतातही तर काही लोक गुंतवणुकीतून भरघोस नफा मिळवतात. आम्ही तुम्हाला गुंतवणुकीचा असाच एक उत्तम पर्याय सांगणार आहोत. ज्यामध्ये कमी गुंतवणुकीवर उत्तम नफा मिळेल. आता तसं पाहायला गेलं तर श्रीमंत होण्याचा कुठलाही शॉर्टकट नाहीये. हो पण तुम्ही पद्धतशीर गुंतवणूक केली तर मात्र तुम्ही बक्कळ पैसा कमवू शकता. ⏩ तरुण वयात कसे व्हाल श्रीमंत: गुंतवणुकीतून उत्तम पैसा कमवायचा असेल तर तुम्हाला लहानपणापासूनच गुंतवणूक करायला पाहिजे. जर तुम्ही २० वर्षांचे असाल तर दररोज फक्त ३० रुपये साठवून साठव्या वर्षी तुम्ही श्रीमंत होऊ शकता. दिवसाला ३० रुपये ठेव म्हणजे महिन्यात ९०० रुपये. दरमहा SIP (Systematic Investment Plan) मध्ये तुम्ही ९०० रुपये गुंतवा. जर तुम्ही ४० वर्षांसाठी दरमहा फक्त ९०० रुपयांची एसआयपी केली तर ही रक्कम कोटींमध्ये असणार आहे. यासाठी तुम्ही दिवसाला ३० रुपये आणि महिन्यात ९०० रुपये बचत करा. ही बचत एसआयपीमार्फत म्युच्युअल फंडामध्ये गुंतवा. एका वर्षात ही गुंतवणूक १०,८०० रुपये होईल. ४० वर्षांत ही गुंतवणूक ४,३२,००० रुपये होईल. म्युच्युअल फंडांला १२.५ टक्के दराने परतावा मिळतो. १२.५ टक्क्यांच्या परताव्यासह ४० वर्षानंतर ही रक्कम खूप मोठी असू शकते. ⏩ ३० वर्षांत कोट्याधीश कसे बनाल? तरुण वयात आपल्याकडे उत्तम आर्थिक सपोर्ट असावा असं प्रत्येकाला वाटतं. आता वाढत्या महागाईचा विचार करता जर तुम्ही ३० वर्षांचे असाल आणि १ कोटी रुपये कमवण्याचं तुमचं टार्गेट असेल तर त्यासाठी तुम्हाला दिवसाला ९५ रुपयांची बचत करावी लागेल. ३५ वर्षांपर्यंत तुम्हाला ही गुंतवणूक करावी लागेल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही ३५ वर्षांसाठी म्युच्युअल फंडामध्ये डिव्हिडंड रीइन्व्हेस्टमेंट प्लॅन मध्ये गुंतवणूक केली तर यावर तुम्हाला तब्बल १५% परतावा मिळेल. ⏩ शेअर बाजार आणि बाँड मार्केट व्यतिरिक्त, प्रत्येक योजनेत सोन्याच्या ईटीएफमध्ये २० टक्के, आरआयटी / इनव्हीआयटीमध्ये १० टक्के गुंतवणूक करण्याची योजना आहे. जे म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करतात त्यांना एफडीमधून अधिक परतावा मिळेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास म्युच्युअल फंडामध्ये वार्षिक १० टक्के नफा सहज मिळतो. तर एफडीवर वार्षिक ५ टक्केच परतावा दिला जातो. ⏩ काय आहे एसडब्ल्यूपी? आता येथे आणखी एक मोठा प्रश्न उद्भवतो, ही एसडब्ल्यूपी म्हणजे काय?, सिस्टमॅटिक पैसे काढण्याची योजना ही एक प्रकारची सुविधा आहे. याद्वारे गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंड योजनेतून निश्चित रक्कम परत मिळते. किती वेळ, किती पैसे काढायचे याची निवड गुंतवणूकदारांनाच करावी लागते. ते हे काम मासिक किंवा त्रैमासिक आधारावर करू शकतात. तसे, मासिक पर्याय अधिक लोकप्रिय आहेत. गुंतवणूकदार केवळ निश्चित रक्कम काढू शकतात किंवा त्यांना हवे असल्यास ते गुंतवणुकीवरील भांडवली नफा काढून घेऊ शकतात. संदर्भ:- कृषी जागरण. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
87
11
इतर लेख