नई खेती नया किसानलोकमत न्युज १८
१००० रुपयांना विकला जातोय हा एक आंबा!
➡️ भारतातील हापूस आंबा जगभरात प्रसिद्ध आहे. पण देशातील एका जातीचा आंबा तर 500 ते हजार रुपयांना एक याप्रमाणे विकला जातो. इतका महाग आंबा आश्चर्य वाटला नां? पण हे खरं आहे. हा आंबा आहे मध्य प्रदेशातील ‘नुरजहाँ’ आंबा. आंब्यांची राणी म्हणून प्रसिद्ध असलेला हा आंबा आपल्या भरभक्कम आकारमानासाठी आणि चवीसाठी प्रसिद्ध आहे. ➡️ जानेवारी -फेब्रुवारीपासून या झाडांना मोहोर येण्यास सुरुवात होते आणि जूनपासून आंबे पिकून तयार होण्यास सुरुवात होते. हा आंबा एक फूट लांबीपर्यंत वाढू शकतो आणि त्याच्या बाठीचे वजन 150 ते 200 ग्रॅम दरम्यान असू शकतं अशी माहिती स्थानिक उत्पादकांनी दिली आहे. या आंब्याचे चाहते फळ झाडावर असतानाच याचं बुकिंग करून ठेवतात. शेतकऱ्याचे अनुभव 👇 ➡️ 'माझ्या बागेत असलेल्या तीन झाडांनी 250 आंबे दिले असून या फळाची किंमत 500 ते 1000 रुपयांपर्यंत आहे. मध्यप्रदेशासह गुजरातमधील लोकांनी देखील आधीच या आंब्यासाठी बुकिंग केलं आहे. यावेळी या आंब्याचे वजन 2 ते 3.5 किलोपर्यंत असेल', असं काठीवाडातील आंबा लागवड करणारे शिवराजसिंह जाधव यांनी सांगितलं. ➡️ या वेळी या आंब्याचे पीक चांगलं आलं आहे. पण कोविड-19 साथीमुळे व्यापारावर परिणाम झाला आहे. गेल्या वर्षी प्रतिकूल हवामानामुळे नूरजहां आंब्याची झाडं नीट बहरली नाहीत. 2019 मध्ये या जातीच्या एका आंब्याचे वजन सरासरी 2.75 किलो होते आणि लोकांनी त्याला 1200 रुपये असा भाव दिला होता, अशी माहिती काठीवाड्यात ‘नूरजहाँ’ आंब्याची लागवड करणारे तज्ज्ञ इशाक मन्सुरी यांनी दिली. संदर्भ:- लोकमत न्युज१८. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
36
12
इतर लेख