AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
७०० रुपयांचा LPG सिलेंडर मिळू शकेल केवळ २०० रुपयात! वाचा कशी मिळवाल ऑफर!
कृषि वार्तान्युज १८ लोकमत
७०० रुपयांचा LPG सिलेंडर मिळू शकेल केवळ २०० रुपयात! वाचा कशी मिळवाल ऑफर!
➡️घरगुती गॅस सिलेंडरचा वापर देशभरामध्ये शहरांपासून गावापर्यंत केला जातो. सरकारने अलीकडेच एलपीजी गॅसच्या किंमतीत ५० रुपयांची वाढ केली आहे. ➡️ज्यानंतर विना-सबसिडीचा १४.२ किलोग्रॅमचा सिलेंडर ६४४ रुपयांवरून ६९४ रुपयाने मिळत आहे. सिलेंडरच्या किंमतीमध्ये डिसेंबर महिन्यात दोन वेळा बदलाव करण्यात आले. ➡️मात्र या महागाईच्या काळातही तुम्ही सिलेंडर केवळ जवळपास २०० रुपयांनी मिळवू शकता. जाणून घ्या कशी मिळवाल ही ऑफर ➡️तुम्ही पीटीएम वर एलपीजी गॅस सिलेंडर बुकिंगवर ५०० रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळवू शकता. देशातील अधिकांश भागामध्ये साधारण ७०० ते ७५० रुपये या दराने घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरची विक्री केली जात आहे. ➡️अशावेळी या ऑफरचा फायदा घेत तुम्ही केवळ २०० ते २५० रुपयांपर्यंत एचपी इंडियन, भारत गॅस एलपीजी सिलेंडर मिळवू शकता. पेटीएम वरून कशाप्रकारे बुक कराल LPG सिलेंडर? सर्वात आधी तुमच्या फोनमध्ये पेटीएम अ‍ॅप डाऊनलोड करा १) अ‍ॅप उघडल्यानंतर 'रिचार्जे व पे बिल 'वर क्लिक करा २) याठिकाणी भारत गॅस, एचपी गॅस किंवा इंडेन यापैकी तुमचा एलपीजी गॅस सिलेंडर प्रोव्हायडर निवडा ३) रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावरून तुमचा LPG ID दाखल करा ४) यानंतर तुम्हाला पेमेंटचा पर्याय दिसेल ५) याठिकाणी पेमेंट करण्याआधी 'फर्स्ट LPG हा प्रोमो कोड वापरा कधीपर्यंत आहे ही ऑफर? हे लक्षात घेणे गरजेचे आहे की, पेटीएमवरून पहिल्यांदा बुकिंग करणारे ग्राहकच ५०० रुपयांपर्यंत कॅशबॅकची ऑफर मिळवू शकतात. पेटीएम एलपीजी सिलेंडर बुकिंग कॅशबॅक ऑफर या ऑफरचा लाभ ग्राहकांना 31 डिसेंबरपर्यंत घेता येईल. अर्थात स्वस्तात सिलेंडर मिळवण्यासाठी तुमच्याकडे केवळ २ दिवस शिल्लक आहेत. संदर्भ - न्युज १८ लोकमत, यासारख्या अधिक महत्वाच्या व कृषी विषयक घडामोडी जाणून घेत रहा व माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
82
18
इतर लेख