सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढविण्याच्या पद्धती
• खते जमिनीवर फेकू नयेत. योग्य ओलावा असतानाच द्यावीत.
• पेरणी करताना खते बियाण्यांखाली पेरून द्यावीत.
• आवरणयुक्त खते/ ब्रिकेटस / सुपर ग्रॅन्यूलसचा वापर करावा. युरिया, निंबोळी पेंडसोबत १:५ प्रमाणात वापर करावा.
• खते पिकांच्या वाढीच्या संवेदनशील अवस्थेत विभागून द्यावीत.
• सूक्ष्म सिंचनाद्वारे द्रवरूप खतांचा वापर करावा.
• तृणधान्य पिकांसाठी खतांचा ४:२:२:१ (नत्र : स्फुरद : पालाश : गंधक) या प्रमाणात, तर कडधान्यांसाठी १:२:१:१ प्रमाणात खताचा वापर करावा.
• सेंद्रिय खतांचा नियमित वापराने जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ दरम्यान आणावा.
• मृदा सुरक्षेकरिता मृदा संधारण, सेंद्रिय शेती, एकात्मिक रासायनिक व सेंद्रिय शेतीद्वारे जमिनीचे आरोग्य जोपासावे. ही काळाची गरज आहे.
हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.