AgroStar
राशीभविष्य! या वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात कसा ठरेल!
राशी भविष्यमहाराष्ट्र टाइम्स
राशीभविष्य! या वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात कसा ठरेल!
➡️हे सरतं वर्ष, वर्षाचा शेवटचा आठवडा आणि महिन्याचा शेवट तुमच्यासाठी कसं ठरेल? नविन वर्षाची सुरवात होण्याआधी काय असेल ग्रह नक्षत्राच्या प्रभाव हे सर्व साप्ताहिक राशीभविष्यात जाणून घेऊया प्रसिद्ध ज्योतिषी नंदिता पांडेय यांच्याकडून. ​मेष – एकूण ग्रहमान पाहता या आठवड्यात आत्मविश्वासाने वागल्याने अपेक्षित गोष्टी साध्य होतील.आर्थिक बाजू ठीक राहील. संगणक, तांत्रिक शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींना हा काळ छान राहील. प्रवासाचे योग येतील. ​वृषभ – एकूण ग्रहमान पाहता हा आठवडा पारिवारिक स्वरूपाचा राहणार आहे. व्यापारात प्रगती करता येईल. भागीदारीचा व्यवसाय विस्तारू शकाल. कौटुंबिक वातावरण सुख-समृद्धीचे असणार आहे. ​मिथुन -ग्रहमानाची साथ मिळाल्याने हा आठवडा अतिशय उत्तम व लाभदायक जाईल. जमिनी संबंधित कामकाजात दिलासा मिळू शकतो. पैसे वसुली, प्रवास व कार्यसिद्धीसाठी अनुकूल काळ आहे, व्यवसायात प्रगती करता येईल. कुटुंबियांसमवेत बाहेर जाण्याचा बेत आखाल. ​कर्क – एकूण ग्रहमान पाहता हा आठवडा काहीसा अडथळ्यांचा असल्याने, त्यातून मार्ग काढावा लागणार आहे. वाहन वा घर खरेदीचे योग संभवतात.घरगुती वातावरण वादासारख्या प्रसंगांनी बिघडणार नाही याची दक्षता घ्या. कामानिमित्त प्रवास योग संभवतात. ​सिंह –एकूण ग्रहमान पाहता या आठवड्यात महत्त्वाच्या गोष्टींचा उकल करण्याचा मानस राहील. तुमच्या आवडत्या विषयात पुढे जाण्याची संधी मिळेल. कमाईत वाढ होण्याची शक्यता राहील. जे मिळाले आहे ते जपून ठेवा हा संदेश आहे. घर व जमिनीबाबतच्या कामांमध्ये प्रगती कराल. ​कन्या – एकूण ग्रहमान पाहता या आठवड्यात दैनंदिन कामकाजात व्यस्त राहणार आहात. कमाईच्या क्षेत्रात काही अडथळे येण्याची शक्यता असली तरी त्यातून लाभ संभवतो. एखाद्या मंगलकार्यात सहभागी व्हावे लागेल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. कार्यक्षेत्रात कार्यरत राहणे योग्य राहील. ​तूळ –ग्रहमानाची उत्तम साथ मिळाल्याने या आठवड्यात यश व कीर्तीत वाढ झाल्याचा आनंद घेता येईल. जमिनीसंबंधातील कामकाजात दिलासा मिळू शकतो. भाग्याची उत्तम साथ मिळेल. ​वृश्चिक –एकूण ग्रहमान पाहता या आठवड्यात भाग्याची उत्तम साथ मिळाल्याने अपेक्षित कामे पार पाडता येतील. प्रवासाचे योग येतील. स्थावरची कामे मार्गी लागतील. नोकरीत बदल संभवतो. आर्थिक आवक चांगली राहील. ​धनू – एकूण ग्रहमान पाहता या आठवड्यात आर्थिक बाजू सावरता येईल. नोकरदारांना दिलासा मिळेल. उत्पन्नाचे स्रोत वाढण्याची शक्यता राहील. लेखन, चित्रकला या क्षेत्रांत लाभ संभवतो. कोर्टकचेरीच्या कामात हितशत्रूंपासून सावध राहावे. कौटुंबिक गोष्टींना प्राधान्य द्या. ​मकर –एकूण ग्रहमान पाहता या आठवड्यात विविध आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. नोकरदारांना दिलासा मिळेल. कौटुंबिक गोष्टींना प्राधान्य द्या व मुलांच्या प्रश्नांची उकल करा. प्रवास योग येतील. ​कुंभ – एकूण ग्रहमान पाहता या आठवड्यात सर्व बाबतीत विचाराने वागल्यास अपेक्षित गोष्टी साध्य होतील. नियोजनाप्रमाणे कृती केल्यास पुष्कळशा गोष्टी आत्मसात कराल. ​मीन – एकूण ग्रहमान पाहता या आठवड्यात अनुकूलतेचा लाभ मिळाल्याने अपेक्षित गोष्टी साध्य होतील. कलाक्षेत्राला चांगले प्रोत्साहन मिळेल. वरिष्ठांची मर्जी सांभाळता येईल. एखाद्या धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. टीप: ही राशी चक्र फक्त भविष्यातील माहितीसाठी आहे. आम्ही (अॅग्रोस्टार) याची तपशील करत नाही आणि कोणत्याही अंधश्रद्धेकडे लक्ष वेधत नाही. जर तुम्हाला राशीचक्रव्दारे भविष्यातील माहिती जाणून घ्यायची असेल किवा रोज याबाबत माहिती पाहिजे असेल, तर कृपया खाली कमेंट करून आम्हाला कळवा. संदर्भ:-महाराष्ट्र टाइम्स . हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
20
1
इतर लेख