AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
राज्य सरकारचा निर्णय 'ई-चावडी' उपक्रम शेतकऱ्यांसाठी वरदान !
कृषी वार्ताAgrostar
राज्य सरकारचा निर्णय 'ई-चावडी' उपक्रम शेतकऱ्यांसाठी वरदान !
☑️शेती संबंधी कामे जलद गतीने आणि सोयीस्कर व्हावी यासाठी सरकार वेगवेगळ्या योजना तसेच उपक्रम राबवत असते. आता सर्वकाही डिजिटल होऊ लागले आहे त्यात शेती विभाग कसा मागे राहील. आतापर्यंत आपण ई-पीक पाहणी तसेच ऑनलाईन सातबारा उतारा यांसारख्या उपक्रमांबद्दल ऐकले असेल. मात्र आता सरकारने शेतकऱ्यांच्या सोयीसाठी अजून एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ☑️आता शेतकऱ्यांना 'ई-चावडी' उपक्रमाच्या माध्यमातून शेतजमिनीसह, अकृष जमिनींचा महसूल भरता येणार आहे. यासाठी लागणाऱ्या ई-पोर्टलचे काम अंतिम टप्प्यात आहे. 1 ऑगस्टपासून राज्यातील शेतकऱ्यांना 'ई-चावडी' या उपक्रमाचा लाभ घेता येणार आहे. सुरुवातीला हा उपक्रम प्रायोगिक तत्वावर घेण्यात येणार आहे. यासाठी काही गावांची निवडदेखील करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे शेतसारा नियमित अदा होणार तसेच कारभारातही तत्परता येणार असल्याचे सांगितले जात आहे. ☑️'ई-चावडी' अंतर्गत मिळणारी सेवा : महसूल विभागाच्या माध्यमातून जमिनीच्या प्रकारानुसार बिन शेतीचा दंड, शेतसारा, नजर अंदाजे रक्कम इत्यादी प्रकारचे कर तसेच गाव नमुना क्रमांक 17 प्रमाणे वसुल केला जातो. या प्रक्रियेसाठी आवश्यक असणाऱ्या संगणीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. संगणीकरणाचे काम तलाठ्यांच्या लक्षात येईल असे सॉफ्टवेअर तयार करण्यात येणार आहे. तसेच शेतसारा वसुलीसाठी सर्व विभागातील निवडक जिल्हे आणि त्यामधील गावे यांची प्रायोगिक तत्वावर निवड करण्यात आली आहे. ☑️संदर्भ:- Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
20
2
इतर लेख