AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
राज्य बॅंकेकडून १०० रुपयांनी वाढ
कृषि वार्ताअॅग्रोवन
राज्य बॅंकेकडून १०० रुपयांनी वाढ
कोल्हापूर : केंद्राने खुल्या साखरेचे किमान विक्री मूल्य २९०० वरून ३१०० केल्यानंतर आता राज्य सहकारी बॅंकेनेही सकारात्मक भूमिका घेताना साखरेच्या मूल्यांकनाच्या दरात १०० रुपयांनी वाढ केली आहे. यापूर्वी बॅंकेने साखरेचे मूल्यांकन ३००० रुपये केले होते. या नव्या दरामुळे कारखान्यांना बॅंकेकडून प्रतिक्विंटल २६३५ रु इतकी उचल मिळू शकेल. मूल्यांकनाच्या ९० टक्के म्हणजे प्रक्रिया व बॅंक वसुलीचे ७५० रुपये वजा जाता कारखान्यांना १८८५ रुपये मिळू शकतील.
बॅंकेने हे नवे परिपत्रक शनिवारी सायंकाळी कारखान्यांना पाठविले आहे. या पत्रात केंद्राने खुल्या साखरेच्या विक्री दरात वाढ केल्यानेच बॅंकही मूल्यांकनात वाढ करीत असल्याचे स्पष्ट म्हटले आहे. केंद्राच्या निर्णयानंतर बॅंकेच्या संचालक मंडळात झालेल्या बैठकीनंतर मूल्यांकनवाढीचा निर्णय घेण्यात आला. _x000D_ संदर्भ – अॅग्रोवन, १९ फेब्रुवारी २०१९
1
0