AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
राज्यावर गारपीटीचे संकट, 'या' जिल्ह्यांसाठी पावसाचा इशारा!
हवामान अपडेटलोकमत
राज्यावर गारपीटीचे संकट, 'या' जिल्ह्यांसाठी पावसाचा इशारा!
➡️पश्चिमी प्रकोप (वेस्टर्न डिस्टर्बन्स) पूर्व अफगाणिस्तान व लगतच्या पाकिस्तानवर आहे. तेथून राजस्थानच्या हवेतील सिस्टीममधून विदर्भापर्यंत ते कार्यरत राहील. त्याचा प्रभाव म्हणून २८ ते २९ डिसेंबर रोजी मराठवाडा व विदर्भात कडकडाटासह काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. ➡️२८ आणि २९ डिसेंबर रोजी विदर्भमध्ये तुरळक ठिकाणी गारपीटची शक्यता आहे. २८ डिसेंबर रोजी मराठवाड्यातही अवकाळीची शक्यता हवामान शास्त्र विभागाने वर्तविली आहे. ➡️विदर्भात तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. कोकण,गोव्याच्या काही भागात किमान तापमानात किमान तापमानात किंचित घट झाली आहे. ➡️उर्वरित राज्यातकिमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदनों विण्यात आले आहे. तर राज्यात सर्वात कमी किमान तापमान जळगाव येथे ११.७ अंश सेल्सिअस एवढे नोंदनों झाले आहे. येथे पावसाची शक्यता ➡️२८ डिसेंबर रोजी औरंगाबाद, जालना, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिगों या आणि २९ डिसेंबर रोजी चंद्रपूर, भंडारा, गोंदिगों या, गडचिरोली येथे पावसाची शक्यता आहे. याव्यतिरिक्त धुळे, नाशिक, जळगाव, बीड,परभणी, हिंगोली, नांदेड, औरंगाबाद, जालना, लातूर या जिल्ह्यांसाठी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. संदर्भ:- लोकमत, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
84
10
इतर लेख