AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
राज्यात ‘ही’ नवीन योजना लागू होणार
कृषि वार्तालोकमत
राज्यात ‘ही’ नवीन योजना लागू होणार
मुंबई – शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र राज्य कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) योजना २१०० कोटी रूपये खर्चून सुरू करण्यात येणार आहे. कृषी व कृषीपूरक व्यवसायांच्या विकासासाठी ही योजना असेल. राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या बैठकीत सदर योजनेला मान्यता देण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांना दिली.
या योजनेसाठी जागतिक बॅंक १४७० कोटी रूपयांचे कर्ज देणार आहे. राज्य शासनाचा हिस्सा ५६० कोटी रूपये असेल तर सीएसआर फंडातून ७० कोटी रूपये देण्यात येतील. स्मार्ट प्रकल्पांतर्गत कृषी मालाच्या पणन विषयक पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे. यामध्ये शेतमाल बाजार प्रवेशाच्या नोंदी, प्रतवारी, गुणवत्ता तपासणी, संगणकीकृत शेतमाल लिलाव पध्दती, साठवणूक सुविधा, निर्यात सुविधा निर्मिती, आस्तित्वातील सुविधांचे आधुनिकीकरण व बळकटीकरण तसेच कृषी उत्पन्न बाजार समित्या व खाजगी बाजार समित्यांना ई-टेड्रिंग प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून एकीकृत बाजार नेटवर्कद्वारे जोडण्याची सुविधा यांचा समावेश आहे. संदर्भ – लोकमत, १६ जानेवारी २०२० जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
22
0