AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
राज्यात ६६ हजार लोकांना मिळणार नोकऱ्या !
नोकरी आणि शिक्षणAgrostar
राज्यात ६६ हजार लोकांना मिळणार नोकऱ्या !
➡️स्वित्झर्लंडमधील दावोस येथे झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये २३ विदेशी कंपन्यांनी महाराष्ट्रासोबत सुमारे ३०,००० कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले. यामुळे महाराष्ट्रातील सुमारे ६६,००० जणांना रोजगार उपलब्ध होईल, असे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले. ➡️स्वाक्षरी केलेल्या विविध गुंतवणूक करारांपैकी ५५ टक्क्यांहून अधिक गुंतवणूकदार हे सिंगापूर, इंडोनेशिया, अमेरिका आणि जपानमधील आहेत. यामध्ये प्रामुख्याने फार्मास्युटिकल्स, कापड, अभियांत्रिकी, पॅकेजिंग, पेपर पल्प आणि फूड प्रोसेसिंग, स्टील, माहिती तंत्रज्ञान, डेटा सेंटर्स, लॉजिस्टिक्स इ. क्षेत्रांचा समावेश आहे. ➡️मॅग्नेटिक महाराष्ट्र २.० ही संकल्पना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्याची अर्थव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी मांडण्यात आली. या उपक्रमांतर्गत एकूण १० आवृत्त्या आयोजित केल्या आहेत ज्याद्वारे आजपर्यंत १२१ सामंजस्य करार करण्यात आले आहेत. यापैकी राज्यात एकूण २.१५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक प्राप्त झाली आहे. यामुळे सुमारे ४ लाख रोजगार निर्माण होतील. 👉इंडोरामा कॉर्पोरेशन आणि इंडोकाउंट इंडस्ट्रीज लि. सारख्या मोठ्या टेक्सटाईल कंपन्या अनुक्रमे महाराष्ट्र, नागपूर आणि कोल्हापूर येथील टेक्सटाईल हबमध्ये गुंतवणूक करतील. 👉मायक्रोसॉफ्ट ही जगातील सर्वात मोठी सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर आयटी कंपनी पुण्यात डेटा सेंटर उभारण्यासाठी 3,200 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. 👉आशिया पल्प अँड पेपर (एपीपी) ही इंडोनेशियातील अग्रगण्य पल्प आणि पेपर उत्पादक कंपनी कागद आणि लगदाच्या उत्पादनासाठी रायगडमध्ये 10,500 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. 👉‘हॅव्हमोर आईस्क्रीम्स प्रायव्हेट लिमिटेड’ पुण्यात आइस्क्रीम बनवण्यासाठी नवीन युनिट सुरू करणार आहे. त्यामुळे अन्न आणि कृषी प्रक्रियेलाही वाव मिळेल. ➡️संदर्भ:- Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
33
3