AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
राज्यात सोयाबीन ३००० ते ६७५० रुपये क्विंटल
समाचारअ‍ॅग्रोवन
राज्यात सोयाबीन ३००० ते ६७५० रुपये क्विंटल
लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती: यामध्ये आवक झालेल्या सोयाबीनला ५७४० ते ७००० रुपये प्रतिक्‍विंटंचा दर मिळाला. १ डिसेंबरला १२ हजार ३०३ क्‍विंटल आवक झालेल्या सोयाबीनचे दर ५७५० ते ६७०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली. सोलापुरात क्विंटलला ४००० ते ६१०० रुपये सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गत सप्ताहात सोयाबीनला चांगला उठाव मिळाला. त्यामुळे दरातही सुधारणा झाली. प्रतिक्विंटलला सर्वाधिक ६१०० रुपये इतका दर मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. बारामतीत क्विंटलला ५३०० ते ६१५१ रुपये बारामती बाजार समितीमध्ये गतसप्ताहात सोयाबीनची सुमारे ५७८ क्विंटल आवक झाली. या वेळी क्विंटलला ५ हजार ३०० ते ६ हजार १५१ रुपये दर मिळाले. परभणीत क्विंटलला ६१०० ते ६४०० रुपये परभणी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी सोयाबीनची २०५ क्विंटल आवक होती. सोयाबीनला प्रतिक्विंटल किमान ६१०० ते कमाल ६४०० रुपये, तर सरासरी ६२०० रुपये दर मिळाले, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. जळगावात क्विंटलला ५००० ते ६२०० रुपये कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांकडून सोयाबीनची अत्यल्प आवक होत आहे. व्यापारी ते व्यापारी, असे व्यवहार होत आहेत. व्यापाऱ्यांनी सोयाबीन साठवून ठेवला आहे. त्याचे दर ५००० ते ६२०० रुपये प्रतिक्विंटल, असे आहेत. लासलगावात क्विंटलला ३००० ते ६२९७ रुपये नाशिक : येथील बाजार समितीत बुधवारी सोयाबीनची आवक ५४० क्विंटल झाली. तिला प्रतिक्विंटल ३००० ते ६,२९७ रुपये दर मिळाला. सर्वसाधारण दर ६,२३१ रुपये राहिले. मागील महिन्याच्या अखेरच्या सप्ताहाच्या तुलनेत ही आवक पुन्हा कमी झाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. अकोल्यात क्विंटलला ५१०० ते ६५०० रुपये अकोला येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या काही दिवसांत सोयाबीनच्या आवकेत थोडी घट दिसून येत आहे. सरासरी तीन ते साडेतीन हजार क्विंटल दरम्यान सोयाबीनची आवक होत आहे. सोयाबीनचे दर काहीसे कमी झाल्याने तसेच पावसाचा अंदाज वर्तविण्यात आल्याने आवकेवर थोडा परिणाम दिसून येत आहे. बाजार समितीत येणाऱ्या सोयाबीनला ५१०० ते ६५०० दरम्यान दर भेटत आहे. सरासरी ५९०० रुपयांचा भाव सध्या सुरु आहे. ग्रामीण भागात सोयाबीनची यापेक्षा कमी दराने खरेदी व्यापाऱ्यांकडून केली जात आहे. अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान फॉलो करण्यासाठी क्लिक करा:ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 संदर्भ:-,अ‍ॅग्रोवन, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा
42
14
इतर लेख