AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
राज्यात सहा दिवस पावसाची शक्यता!
कृषी वार्ताअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
राज्यात सहा दिवस पावसाची शक्यता!
➡️ गेल्या दोन दिवसांपासून उन्हाचा चटका कमी झाला आहे. राज्यात पाच ते सहा दिवस पूर्वमोसमी पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला. ➡️ राज्यात तयार झालेल्या ढगाळ वातावरणामुळे उन्हाचा पारा खाली आला आहे. मात्र, काही भागात होत असलेल्या पावसामुळे उकाड्यात वाढ झाल्याने सकाळपासून उकाडा जाणवत आहे. गेल्या आठवड्यात ४३ अंश सेल्सिअसपर्यंत गेलेला पारा आता खाली आहे. सरासरीच्या तुलनेत दोन अंश सेल्सिअसने घट झाली आहे. त्यामुळे महाबळेश्वर येथे २९.६ अंश सेल्सिअसची सर्वात कमी कमाल तापमान नोंदविले गेले. ➡️ रविवारी (ता. ११) सकाळी चोवीस तासांत विदर्भातील अकोला येथे सर्वाधिक ४१.९ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदविले गेले. काही भागात किमान तापमानात चढउतार झाले असून महाबळेश्वर येथे १९.४ सेल्सिअसची सर्वात कमी किमान तापमान नोंदविले गेले. ➡️ सध्या मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कर्नाटक व केरळ या या दरम्यान चक्रिय वाऱ्यांची स्थिती आहे. बंगालचा उपसागर, श्रीलंका, दक्षिण तमिळनाडूची किनारपट्टी या भागात चक्रिय वाऱ्याची स्थिती आहे. त्यातच पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे बंगालच्या उपसागरातून बाष्पाचा पुरवठा होत आहे. परिणामी पुढील पाच ते सहा दिवस विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाच्या काही भागात मेघगर्जना, वादळी वारा, विजांसह पाऊस पडणार आहे. तर विदर्भात तुरळक ठिकाणी गारपिट होण्याची शक्यता आहे. येथे होणार अवकाळी पाऊस सोमवार(आज) : रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ मंगळवार : रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, संपूर्ण विदर्भ बुधवार : रत्नागिरी, सिंधुदुर्ग, संपूर्ण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ गुरूवार : संपूर्ण विदर्भ यासारख्या अधिक उपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020क्लिक करा. संदर्भ -अ‍ॅग्रोवन, यासारख्या अधिक महत्वाच्या व कृषी विषयक घडामोडी जाणून घेत रहा व माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया खाली कंमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. संबंधित बातम्या ulink://android.agrostar.in/articleDetail?articleId=Article_20210410_MH_KV&latestArticle=false&otherArticlesAvailable=false
84
12
इतर लेख