AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
राज्यात विजांच्या कडकटासह अतिवृष्टीची शक्यता!
हवामान अपडेटडॉ. रामचंद्र साबळे, ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ
राज्यात विजांच्या कडकटासह अतिवृष्टीची शक्यता!
➡️महाराष्ट्रावरील हवेचे दाब १००६ हेप्टापास्कल इतके कमी होत आहेत.दिनांक १४ ऑक्टोबर ते १६ ऑक्टोबर नंतर महाराष्ट्रावरील हवेचा दाब १००२ ते १००४ हेप्टापास्कल इतके कमी होतील आणि महाराष्ट्रावर तीव्र कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन दिनांक १३ ऑक्टोबर २०२१ रोजी चक्रीय वादळ ओरिसा जवळील किनार पट्टीवर धडकेल. दिनांक १६ ऑक्टोबर रोजी पूर्व किनारपट्टी भागात ९९८ हेप्टापास्कल इतके कमी होताच वादळीवारे आणि जोराचे पावसाने ओरिसा जवळील किनार पट्टी भागात फार नुकसान कारक ठरणे शक्य आहे.येत्या रविवारी व सोमवारी कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात विजांचे कडकटासह व ढगांचे गडगडासहित काही ठिकाणी कमी कालावधीत जोराचे पाऊस होणे शक्य असून काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे.त्यात प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्र नंदुरबार जिल्हा, याचा समावेश प्रामुख्याने आहे. कोकण - सिंधुदुर्ग, रत्नागिरी व ठाणे जिल्ह्यात रविवारी ४० मी.मी. तर रायगड जिल्ह्यात ३० मी.मी पावसाची शक्यता आहे.मात्र सोमवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६२ मी.मी, रत्नागिरी जिल्ह्यात ४० मी. मी.आणि ठाणे व रायगड जिल्ह्यात ३२ ते ३५ मी.मी. पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्र : रविवारी नाशिक धुळे व नंदुरबार जिल्ह्यात शक्यता असून ६५ ते ८२ मी. मी. पावसाची शक्यता आहे.तर जळगाव जिल्ह्यात ३१ मी.मी. पावसाची शक्यता आहे. सोमवारी नाशिक जिल्ह्यात २५ मी. मी.वनंदुरबार जिल्ह्यात ५ मी. मी. पावसाची शक्यता आहे. मराठवाडा : रविवारी बीड, जिल्ह्यात ५१ मी. मी. पावसाची शक्यता असून उस्मानाबाद, लातूर,व परभणी जिल्ह्यात ४५ मी. मी.पावसाची शक्यता आहे. तसेच नांदेड, जालना व हिंगोली जिल्ह्यात २८ ते ३६ मी. मी. पावसाची शक्यता आहे.सोमवारी उस्मानाबाद लातूर, बीड या जिल्ह्यात ३१ ते ३८ मी. मी. शक्यता असून हिंगोली जिल्ह्यात ५ मी. मी. जालना जिल्ह्यात १७ मी .मी. आणि परभणी जिल्ह्यात २६ मी. मी. पावसाची शक्यता आहे. पश्चिम विदर्भ: रविवारी बुलढाणा जिल्ह्यात ३१ मी. मी. पावसाची शक्यता आहे वाशीम जिल्ह्यात २१ मी. मी अकोला जिल्ह्यात १० मी. मी.अमरावती जिल्ह्यात १५ मी. मीपावसाची शक्यता आहे. मध्य विदर्भ : रविवारी येवतमाळ वर्धा व नागपूर जिल्ह्यात १० ते १८ मी. मी. पावसाची शक्यता आहे. तसेच सोमवारी यवतमाळ जिल्ह्यात ९ मी.मी.पावसाची शक्यता आहे. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:-डॉ. रामचंद्र साबळे, ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ , हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
67
7
इतर लेख