AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
राज्यात लॉकडाऊन लागणार, बियाणे, खताच्या दुकानाचं काय?; शेतमाल शेतातच पडून राहणार का ?
कृषी वार्ताTV9 Marathi
राज्यात लॉकडाऊन लागणार, बियाणे, खताच्या दुकानाचं काय?; शेतमाल शेतातच पडून राहणार का ?
➡️ राज्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रोज हजारोंच्या संख्येने राज्यात नव्याने रुग्णांची भर पडत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मृतांचा आकडासुद्धा वाढत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे कोरोनाला वेळीच थोपवण्यासाठी राज्य सरकार लॉकडाऊन लागू करणार आहे. तसे संकेत आद देण्यात आले आलेयत. मात्र, राज्यात जर लॉकडाऊन लागू केल्यानंतर राज्यात कोणत्या गोष्टी सुरु राहतील आणि कोणत्या बंद याबाबत अनेकांना प्रश्न पडले आहेत. शेतकऱ्यांनासुद्धा हीच चिंता सतावते आहे. या पार्श्वभूमीवर कृषीमंत्री दाद भुसे यांनी मोठी महिती दिली आहे. त्यांनी शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येणार नसल्याचं म्हटलं आहे. ते मुंबईत ‘टीव्ही 9 मारठी’शी बोलत होते. जिल्हा पातळीवर खास कक्ष उभारण्यात येणार ➡️ यावेळी बोलताना दादा भुसे यांनी या लॉकडाऊनमध्ये शेतकऱ्यांना कोणताही अडचण येणार नसल्याची ग्वाही दिली. राज्यात लॉकडाऊन लागू केल्यानंतर शेतकऱ्यांचा शेतमाल थेट ग्राहकांपर्यंत पोहचवण्यावर भर देण्यात येईल असे ते म्हणाले. त्यासाठी जिल्हा पातळीवर खास कक्ष उभारण्यात येणार आहे. मागील लॉकडाऊनमध्ये शेतीशी संबधित दुकाने, शेतमाल बाजारात येण्याच्या दृष्टीने सर्व बाबींना लॉकडाऊनमध्ये सूट मिळाली होती. यावेळीही तसंच होईल, असे दादा भुसे म्हणाले. शेतमाल लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न करणार ➡️ राज्यात लवकरच लॉकडाऊन लागू करण्यात येणार असल्यामुळे अनेक शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. त्यांच्या शेतातली शेतमाल लोकांपर्यंत तसेच बाजारात कसा पोहोचणार असा प्रश्न विचारला जातोय. यावर बोलताना त्यांनी मागील लॉकडाऊनच्या आठवणी सांगितल्या. ➡️ मागील देशव्यापी लॉकडाऊनमध्ये कृषी क्षेत्राने अर्थव्यवस्थेला तारले होते. अजूनही कोणालाही अन्नधान्य कमी पडले नाही. या यशामागे शेतकऱ्यांचे श्रेय आहे. यावेळीसुद्धा शेतमालामध्ये वाढ दिसेल. शेतकऱ्यांनी पिकवलेला माल लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी आम्ही मागील वेळेसारखाच प्रयत्न करु असे दादा भुसे यांनी सांगितलंय. राज्यात 15 दिवसांचा लॉकडाऊन ➡️ दरम्यान, राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता राज्य सराकरने राज्यात 15 दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्याची अधिकृतपणे घोषणा करणार आहेत. यासारख्या अधिक उपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020क्लिक करा. संदर्भ -TV9 Marathi, यासारख्या अधिक महत्वाच्या व कृषी विषयक घडामोडी जाणून घेत रहा व माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया खाली कंमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा.
27
9
इतर लेख