AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
राज्यात या ठिकाणी पावसाची शक्यता!
हवामान अपडेटसंदर्भ:- डॉ. रामचंद्र साबळे, ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ
राज्यात या ठिकाणी पावसाची शक्यता!
➡️महाराष्ट्र राज्यात पश्चिम विदर्भ, मध्य विदर्भ, पूर्व विदर्भात पावसाचे प्रमाण मध्यम स्वरूपाचे राहणे शक्य असून मराठवाड्यात हलक्या स्वरूपाची अथवा अल्प प्रमाणात पाऊस राहील. ➡️कोल्हापूर, सांगली, सातारा व कोकणातील रायगड, सिंधुदुर्ग,रत्नागिरी व ठाणे जिल्ह्यांत पावसाचे प्रमाण चांगले राहील.हवामान ढगाळ राहील .पावसाचा जोर कमी झाल्याचे उत्तर महाराष्ट्र , मराठवाड्यात जाणवेल.दिवसातील ➡️बराच कला पावसात उघडीप व सूर्यप्रकाश तर थोडा पाऊस होईल. ➡️कोकण -कोकणात रविवार १ रोजी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड व ठाणे जिल्ह्यात अतीवृष्टीची शक्यता असून, सोमवारी रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत अतिवृष्टीची शक्यता आहे. रत्नागिरी व रायगड जिल्ह्यात ६५ मिमी व ठाणे जिल्ह्यात ६२ मी मी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात ५० मिमी पावसाची शक्यता आहे. ➡️उत्तर महाराष्ट्र - नाशिक जिल्ह्यात २० ते ३० मिमी पावसाची शक्यता आहे. तर धुळे,जळगाव,नंदुरबार जिल्ह्यात रविवारी व सोमवारी ५-१० मिमी पावसाची शक्यता आहे. ➡️मराठवाडा - मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात या आठवड्यात पावसाचे प्रमाण अल्प राहील.औरंगाबाद जिल्ह्यात मात्र सोमवारी ३६ मिमी पावसाची शक्यता आहे. कृषी सल्ला १) भात खाचरात पाण्याची पातळी रोप लागणीपासून रोपे लागणीपासून रोपे स्थिर होईपर्यंत १-२ सेंमी व रोपांच्या वाढीच्या अवस्थेत २-३ सेंमी ठेवावी. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- डॉ. रामचंद्र साबळे, ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
112
13
इतर लेख