क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
कृषी वार्ताअॅग्रोवन
राज्यात मेघगर्जनेसह पूर्वमोसमी पावसाची शक्यता!
➡️ झारखंड ते उत्तर कर्नाटक, छत्तीसगड आणि तेलंगाणादरम्यान कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होत आहे. यामुळे विदर्भात पुन्हा पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे आहे. ➡️ येत्या बुधवारपासून विदर्भातील भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, यवतमाळ जिल्ह्यांत मेघगर्जना, वादळ व विजांच्या कडकडाटासह पूर्वमोसमी पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला. ➡️ देशात एक मार्चपासून पूर्वमोसमी पावसासाठी पोषक स्थिती बनत असल्याने वातावरणात चांगलेच बदल होत आहे. त्यातच मागील तीन दिवसांपासून पूर्वमोसमी पावसाचे मळभ दूर झाल्याने उन्हाचा चटका वाढू लागला आहे. यामुळे कमाल तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली. रविवारी सकाळी चोवीस तासांत विदर्भातील अकोला येथे सर्वाधिक ४१ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंदविले गेले. ➡️ राज्यात पुणे, कोल्हापूर, महाबळेश्‍वर, नाशिक, सांगली, सोलापूर, मुंबई या भागात कमाल तापमान हे सरासरीएवढे होते. मराठवाडा, विदर्भातील अनेक भागांत कमाल तापमान हे सरासरीच्या तुलनेत दोन अंश सेल्सिअसपर्यंत घट झालेली होती. कमाल तापमानाबरोबर किमान तापमानातही काही भागात किंचित घट झालेली आहे. पुणे येथे सर्वांत कमी १७.९ अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमान नोंदविले गेले. ➡️ गेल्या दोन दिवसांपासून बिहार आणि परिसर व झारखंड परिसरात चक्रीय वाऱ्याची स्थिती तयार होत आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर आहे. तसेच पंबाज व परिसरातही चक्रीय वाऱ्याची स्थिती आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून १.५ आणि २.१ किलोमीटर उंचीवर आहे. उत्तरेकडील पूर्व उत्तर प्रदेशाच्या परिसर, आसामचा मध्य भाग व परिसर आणि दक्षिणेकडील केरळ व परिसरातही चक्रीय वाऱ्याची स्थिती आहे. त्यामुळे विदर्भातील वातावरणात वेगाने बदल होऊ लागले आहेत. यासारख्या अधिक उपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020क्लिक करा. संदर्भ -Agrowon, यासारख्या अधिक महत्वाच्या व कृषी विषयक घडामोडी जाणून घेत रहा व माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया खाली कंमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा.
55
4
संबंधित लेख