AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
राज्यात मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता!
हवामान अपडेटडॉ. रामचंद्र साबळे (जेष्ठ कृषी हवामान तज्ञ )
राज्यात मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता!
महाराष्ट्रावर १००४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील तर उत्तर भारतावर हवेचे दाब १००० ते ९९६ हेप्टापास्कल इतके कमी राहूनही बाष्प निर्मिती व त्यातून ढगनिर्मिती या भागात वाढ होत नाही. कोकण:- सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिनांक २८ व २९ जून रोजी ११ व १८ मि.मी, रत्नागिरी जिल्ह्यात ४० व १३ मि.मी, रायगड जिल्ह्यात ७ व १२ मि.मी आणि ठाणे जिल्ह्यात ७ ते ८ मि.मी पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहील. उत्तर महाराष्ट्र:- नाशिक जिल्ह्यात दिनांक २८ व २९ जून रोजी ४ ते १७ मि.मी, धुळे व नंदुरबार जिल्ह्यात ३ मि.मी तर जळगाव जिल्ह्यात १४ ते २० मि.मी पावसाची शक्यता आहे. या आठवड्यात वाऱ्याचा ताशी वेग १६ ते २१ कि.मी राहील. त्यामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढेल. सकाळची सापेक्ष आर्द्रता ६५ ते ८०% तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ३८ ते ४८% राहील. मराठवाडा:- दिनांक २८ व २९ जून रोजी १५ ते २० मि.मी पावसाची शक्यता असून लातूर जिल्ह्यात १६ व १४ मि.मी, नांदेड जिल्ह्यात १६ व २५ मि.मी, बीड जिल्ह्यात १९ व ९ मि.मी, परभणी जिल्ह्यात ३२ व १४ मि.मी, हिंगोली जिल्ह्यात १६ व २१ मि.मी, जालना जिल्ह्यात ७७ व ९ मि.मी तर औरंगाबाद जिल्ह्यात ८४ व ६३ मि.मी पावसाची शक्यता आहे. पूर्व विदर्भ:- दिनांक २८ व २९ जून रोजी ४ व ७७ मि.मी, गडचिरोली जिल्ह्यात ११ व ७७ मि.मी, भंडारा जिल्ह्यात ५ व १० मि.मी, गोंदिया जिल्ह्यात ५ मि.मी पावसाची शक्यता आहे. चंद्रपूर जिल्ह्यात वाऱ्याची दिशा अग्नेयेकडून राहील तर उर्वरित जिल्ह्यात नैऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते १५ कि.मी राहील. दक्षिण पश्चिम महाराष्ट्र:- दिनांक २८ व २९ जून रोजी कोल्हापूर जिल्ह्यात ३४ व ३८ मि.मी, सांगली जिल्ह्यात ३७ व ६० मि.मी, सातारा जिल्ह्यात ४० व २२ मि.मी, सोलापूर जिल्ह्यात ११ व १३५ मि.मी, पुणे जिल्ह्यात १४ व ४० मि.मी तसेच नगर जिल्ह्यात ७२ व १४ मि.मी पावसाची शक्यता आहे. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७० ते ८५% तर दुपारची ३९ ते ५८% राहील. पश्चिम विदर्भ:- दिनांक २७ व २८ जून रोजी ३२ व १० मि.मी पावसाची शक्यता आहे तर अकोला जिल्ह्यात २१ व १३९ मि.मी, वाशीम जिल्ह्यात २१ व १३९ मि.मी, अमरावती जिल्ह्यात १७ व ५१ मि.मी पावसाची शक्यता आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून तर उर्वरित जिल्ह्यात वायव्येकडून राहील. मध्य विदर्भ:- दिनांक २८ व २९ जून रोजी यवतमाळ जिल्ह्यात ११ व १३९ मि.मी, वर्धा व नागपूर जिल्ह्यात ४ व ८३ मि.मी पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा आग्नेयकडून राहील. तसेच सकाळची सापेक्ष आर्द्रता ७६ ते ८०% राहील तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ४० ते ४२% राहील. आपण पाहिलेल्या पुर्वानुमाना नुसार शेतकरी बांधवांनी, जिथे पावसात ८ ते १० दिवस उघडीप आहे आणि पावसाची शक्यता कमी आहे तिथे ठिबक सिंचन, तुषार सिंचन अथवा पाटाने संरक्षित पाणी द्यावे. तसेच ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली आहे परंतु बियाणे उगविले नसेल तिथे दुबार पेरणी करताना बियाणांची उगवण शक्ती तपासून चांगला पाऊस म्हणजेच ६५ मि.मी ओलावा झाल्यानंतरच पेरणी करावी.फळबागांना ठिबक सिंचनाने पाणी द्यावे. व सर्व पिकांमधील तणांचे नियंत्रण करावे.
संदर्भ:- डॉ रामचंद्र साबळे (जेष्ठ कृषी हवामान तज्ञ) हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
42
0
इतर लेख