कृषि वार्तापुढारी
राज्यात फक्त ५०% ऊस गाळप
राज्यातील महापुराच्या स्थितीमुळे कोल्हापूर व सांगली जिल्हयातील अपेक्षित ऊस गाळपामध्ये घट आलेली आहे. शिवाय मराठवाडा व विशेषत: सोलापूर जिल्हयाला गतवर्षीच्या दुष्काळी स्थितीमुळे ऊसाची उपलब्धता अपेक्षेपेक्षा घटली आहे.
याचा एकत्रित परिणाम हंगामपूर्व ऊस उपलब्धतेच्या अंदाजात घट झालेली आहे. याबाबत साखर आयुक्तालयाने नुकत्याच घेतलेल्या आढावा बैठकांमध्ये साखर कारखान्यांच्या कार्यकारी संचालकांनी अपेक्षित ऊस गाळपाचा आकडा नमूद केल्यानंतर ऊस गाळपात आणखी घट येणार असल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती आयुक्तालयातील साखर सहसंचालक दत्तात्रय गायकवाड यांनी दिली. ते म्हणाले, चालू वर्षी २०१९-२० मधील गाळप हंगामात प्राप्त प्रस्तावांपैकी १५० साखर कारखान्यांना ऊस गाळप परवाने वितरित कऱण्यात आलेले आहेत. त्यापैकी १४३ साखर कारखान्यांचा हंगाम सुरू आहे. उर्वरित कारखाने अदयाप सुरू झालेले नाहीत. मात्र, चालू वर्षी ऊस उपलब्धता कमी असल्यामुळे तोडणी कामगारांना देण्याची आगाऊ रक्कम कमी देण्यात आल्याची चर्चा आढावा बैठकीत झाली. संदर्भ – पुढारी, २२ जानेवारी २०२० जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
10
0
इतर लेख