AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
हवामान अपडेटMausam Tak Devendra Tripathi
राज्यात पावसाची संततधार सुरूच!
🌨️मागील चार-पाच दिवसांपासून पावसाची संततधार सुरुच आहे. पावसामुळे शेती कामे खोळबंली असून पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ लागले आहे. तसेच मका, ज्वारी, उडीद, सोयाबीन या पिकांच्या निकोप वाढीसाठी देखील पावसाची उघडीप आवश्यक असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. सुमारे आठ ते १० हजार हेक्टरवरील पूर्वहंगामी कापूस पिकाची अतिपावसात मोठी हानी झाली आहे. 🌨️पावसाच्या संततधारेमुळे शेतात तण वाढण्याचे प्रमाण वाढले आहे. ते नियंत्रण करण्यासाठी तणनाशकांचा उपयोग करावा लागेल. पण त्यासाठी पावसाची विश्रांती हवी आहे. पाऊस थांबत नसल्याने तणनाशकांची फवारणीदेखील शेतकरी करू शकत नसल्याचे दिसत आहे. तर या सर्व कामाचे नियोजन करण्यासाठी आपल्या भागातील हवामान अंदाज व्हिडिओ द्वारे जाणून घ्या. 🌨️संदर्भ:- Mausam Tak Devendra Tripathi हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
23
5
इतर लेख