AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
राज्यात पावसाची शक्यता, पण कुठे?
हवामान अपडेटAgroStar
राज्यात पावसाची शक्यता, पण कुठे?
👉🏻राज्यातील मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामधील काही भागांमध्ये येत्या दोन दिवसांमध्ये पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. काही ठिकाणी यलो अलर्टही दिला आहे. पुढच्या तीन दिवसांमध्ये ठिकठिकाणी ढगाळ वातावरण असेल आणि तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडतील, असेही हवामान विभागाने अंदाज दिला आहे. पुण्यात मात्र किमान तापमान वाढल्याने उकाडा जाणवत आहे. 👉🏻राज्यामधील छत्रपती संभाजीनगर, नगर, नाशिक, धुळे, जळगाव या जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे. काही भागात विजांच्या कडकडाटासह हलक्या सरी कोसळतील. तर पुणे, सांगली, सातारा, जालना, ठाणे, रायगड, नंदूरबार जिल्ह्यात काही भागांमध्ये ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच धाराशिव, बीड, सोलापूर या जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या सरी कोसळतील. 👉🏻तसेच खानदेशातील धुळे आणि जळगाव जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह, ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. 👉🏻उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगांव, नाशिक, नगर अशा 5 जिल्ह्यात व लगतच्या परिसरात तसेच खान्देश, नाशिकपासून कोल्हापूर सोलापूरपर्यंतच्या संपूर्ण मध्य महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे.तर हा सगळा हवामान अंदाज पाहता सर्व शेतकऱ्यांनी सतर्क राहून पिकांचे योग्य ते नियोजन करावे. 👉🏻संदर्भ : Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
31
0
इतर लेख