AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
राज्यात थंडीची चाहूल
हवामान अपडेटAgrowon
राज्यात थंडीची चाहूल
राज्यात थंडीची चाहूल सुरू झाली आहे. मात्र तापमानातील चढ-उतारामुळे कमाल व किमान तापमानातील तफावत वाढली आहे. राज्यात पहाटे थंडी व दुपारी उन्हाचा चटका बसत आहे. तर कोकणात काही ठिकाणी पावसाचा अंदाज असून, बाकीच्या राज्यात मुख्यत: कोरडया हवामानाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. राज्याच्या कमाल व किमान तापमानात चढ-उतार होत आहे. रविवारी सकाळपर्यंच्या 24 तासांमध्ये कोकणातील रत्नागिरी येथे उच्चांकी कमाल 36.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. काही ठिकाणी तापमान 33 अंशापार जात उन्हाचा चटका वाढला आहे. तर किमान तापमानात घट सुरूच असून, अनेक ठिकाणी किमान तापमानाचा पारा 17 अंशांच्या खाली घसरला आहे. अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- अॅग्रोवन, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
24
3