AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
राज्यात थंडीचा कहर होत असतानाच पावसाची शक्यता
कृषि वार्तालोकमत
राज्यात थंडीचा कहर होत असतानाच पावसाची शक्यता
पुणे – उत्तर भारतात थंडीचा कहर होत असतानाच राज्यात पुढील दोन दिवसात पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. २२ ते २३ डिसेंबरला कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाडयात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यात सर्वांत कमी किमान तापमान चंद्रपूर येथे ११.८ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले आहे. राज्यात कोकण, गोव्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भाच्या काही भागात किंचित वाढ झाली आहे. राज्यातील अनेक ठिकाणी किमान तापमान सरासरीच्या जवळपास पोहचले आहे. २० ते २१ डिसेंबर रोजी गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. २२ डिसेंबरला कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाडयात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. संदर्भ – लोकमत, २० डिसेंबर २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
22
0