हवामान अपडेटMausam Tak Devendra Tripathi
राज्यात थंडीचा कहर वाढणार!
👉🏻राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी पावसाने धुमाकूळ घातला होता. पुणे, मुंबई, ठाणे परिसरामध्ये पाऊस कोसळला होता. अशात पावसाचं सत्र संपलेलं असून पुन्हा एकदा थंडीची चाहूल लागण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
राज्यामध्ये किमान तापमानाचा पारा 14 ते 15 अंश सेल्सिअस पर्यंत आला आहे. त्यामुळे गारठा जाणवायला लागला आहे.
👉🏻दरम्यान, देशासह राज्यातील वातावरण सातत्याने बदलताना दिसत आहे. त्यामुळे या बदलत्या वातावरणात आरोग्याची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे.
👉🏻संदर्भ: Mausam Tak Devendra Tripathi
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.