AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
राज्यात तुरळक सरींची शक्यता!
कृषी वार्ताअ‍ॅग्रोवन
राज्यात तुरळक सरींची शक्यता!
➡️ पावसासाठी पोषक वातावरण नसल्याने राज्यात मागील दोन ते तीन दिवसांपासून आकाश निरभ्र झाले आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाचा शिडकावा होत आहे. आज (सोमवारी) राज्यातील बहुतांशी भागांत ऊन राहणार आहे. उद्याही (मंगळवारी) स्थिती काहीशी कायम राहणार आहे. राज्यात बुधवार (ता. ७) पासून काही प्रमाणात पावसासाठी पोषक स्थिती तयार होऊन तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला. ➡️ राज्यात पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे उन्हाचा चटका सकाळपासून वाढत आहे. काही भागांत दुपारनंतर काही अंशी ढगाळ वातावरण तयार होत आहे. तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडत आहे. यामुळे हवेत चांगलाच गारवा तयार होत आहे. कमाल तापमानाबरोबर किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत एक अंश सेल्सिअसने घट झाली आहे. महाबळेश्‍वर येथे १७.३ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. वाढत्या उन्हामुळे मध्य महाराष्ट्रातील सातारा, मालेगाव येथील कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत चार अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. उर्वरित भागात सरासरीच्या तुलनेत एक ते तीन अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. रविवारी (ता. ४) सकाळी आठ वाजेपर्यंत अकोला येथे ३७.७ अंश सेल्सिअसची नोंद झाली. तर, मध्य महाराष्ट्रात २२ ते ३६ अंश सेल्सिअसच्या दरम्यान कमाल तापमान नोंदविले गेले. कोकणात ३० ते ३३ अंश सेल्सिअस, मराठवाड्यात ३४ ते ३५ अंश सेल्सिअस, तर विदर्भात ३३ ते ३७ अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान नोंदविले गेले. येथे होणार जोरदार पाऊस ➡️ मंगळवार : चंद्रपूर, गडचिरोली. ➡️ बुधवार : नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, नागपूर. ➡️ गुरुवार : नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- अ‍ॅग्रोवन, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
48
13
इतर लेख