AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
राज्यात जोरदार पावसासोबत गारपिटीचा इशारा!
हवामान अपडेटअ‍ॅग्रोवन
राज्यात जोरदार पावसासोबत गारपिटीचा इशारा!
➡️राज्यात पावसाला पोषक हवामान झाल्याने आज उत्तर महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे, नाशिक जिल्ह्यांत जोरदार वारे, मेघगर्जना, विजांसह वादळी पावसाची शक्यता आहे. जळगाव, नगरसह पालघर जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. ➡️उद्या विदर्भातील अमरावती, अकोला जिल्ह्यांत गारपीट होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. ➡️एका पाठोपाठ सातत्याने येणारे पश्‍चिमी चक्रावात आणि अरबी समुद्रावरून होणारा बाष्पाचा पुरवठा पूरक ठरल्याने आज हिमालय पर्वत आणि लगतच्या राज्यात बर्फवृष्टी व मेघगर्जनेसह पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. ➡️याचा प्रभाव महाराष्ट्रातही जाणवणार असून, उत्तर महाराष्ट्रात ढगाळ हवामान होत आहे. आज उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यात ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहून वादळी पावसाची शक्यता आहे. तर उद्यापासून उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता असून, विदर्भातील अमरावती, अकोला जिल्ह्यांत गारपीट होण्याचा इशारा देण्यात आला आहे. अनेक भागात थंडी कमी झाली आहे. ➡️वादळी वारे, विजांसह पावसाची शक्यता (येलो अलर्ट) : नंदूरबार, धुळे, नाशिक. पावसाची शक्यता : पालघर, नगर, जळगाव. संदर्भ:- अ‍ॅग्रोवन, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
98
6
इतर लेख