समाचारअ‍ॅग्रोवन
राज्यात खरबूज फळाचा ५०० ते २००० रुपये भाव!
➡️ अकोलाः येथील बाजारात खरबुजाची दररोज १५ ते २० टनांची आवक होत आहे. सरासरी दर १००० रुपयांपासून तर १८०० रुपयांपर्यंत मिळत आहे. पावसाळी वातावरण आठवडाभर राहिल्याने मागणीत घट आली होती. मात्र, आता वातावरण निवळले आहे. खरबुजाची मागणी वाढेल, अशी आशा विक्रेत्यांनी व्यक्त केली. ➡️ पुणे:- क्विंटलला १२०० ते १५०० रुपये.. वाढत्या उन्हाळ्यामुळे गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये खरबुजाची आवक वाढू लागली आहे. गुरुवारी (ता.२५) खरबुजाची सुमारे ३० टेम्पो आवक झाली होती. यावेळी आवक आणि मागणी संतुलित राहिल्याने प्रति किलोला १२ ते १५ रुपये दर होता. खरबुजाची आवक ही प्रामुख्याने पुणे जिल्ह्यातील इंदापूर, दौंड, बारामतीसह सोलापूर जिल्ह्यातून होत आहे. गेल्या आठवड्यात आवक आणि दर स्थिर असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. ➡️ नाशिक : क्विंटलला ९०० ते १५०० रुपये.. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता.२४) खरबुजाची आवक २२० क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल किमान ९०० ते कमाल १५०० रुपये असा दर मिळाला. सर्वसाधारण दर १२०० रुपये होते. सध्या आवक सर्वसाधारण आहे. मागणी वाढत आहे. मात्र अद्याप दर कमीच आहेत, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. तसेच शनिवारी (ता.२०) आवक १०० क्विंटल झाली. त्यास ९०० ते २२०० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर १५०० रुपये होता. शुक्रवारी (ता.१९) आवक २९० क्विंटल झाली. त्यास ५०० ते ९००, तर सर्वसाधारण दर ७०० रुपये होता. गुरुवारी (ता.१८) खरबुजाची आवक ५२ क्विंटल झाली. त्यास ९०० ते १८०० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर १४०० राहिला. गत सप्ताहात आवक सर्वसाधारण होती. मात्र आवकेत हळूहळू वाढ होत आहे. ➡️ जळगाव :- क्विंटलला ११०० ते १५०० रुपये.. जिल्ह्यात खरबुजाची आवक बाजार समित्यांमध्ये अत्यल्प होत आहे. लागवड बऱ्यापैकी झाली आहे. सध्या काढणीला सुरवात होत आहे. सुरवातीलाच किमान ११ व कमाल १५ रुपये प्रतिकिलोचा दर थेट शिवारात शेतकऱ्यांना मिळत आहे. ➡️ परभणी:- क्विंटलला ८०० ते १५०० रुपये.. येथील फळे भाजीपाला मार्केटमध्ये बुधवारी (ता.२४) खरबुजाची ७०० क्विंटल आवक होती. खरबूजाला प्रतिक्विंटल किमान ८०० ते कमाल १५०० रुपये, तर सरासरी ११५० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली. तसेच सध्या येथील मार्केटमध्ये स्थानिक परिसरातून दररोज ७०० ते ८०० क्विंटल खरबुजाची आवक होत आहे. गेल्या आठवडाभरात प्रतिक्विंटल ७०० ते १५०० रुपये दर मिळाले. बुधवारी (ता.२४) खरबुजाची ७०० क्विंटल आवक झाली. घाऊक विक्रीचे दर प्रतिक्विंटल ८०० ते १५०० रुपये किरकोळ विक्री प्रतिकिलो १५ ते २० रुपये दराने सुरु होती, अशी माहिती मिळाली. ➡️ औरंगाबाद : क्विंटलला ५०० ते ९०० रुपये दर.. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. २५) खरबुजाची १२० क्विंटल आवक झाली. त्यास क्विंटलला ५०० ते ९०० रुपये दर मिळाला. सरासरी दर ७०० रुपये प्रतिक्विंटल राहिले, अशी माहिती बाजार समितीतर्फे देण्यात आली. ➡️ नगर:- क्विंटलला ५०० ते २००० रुपये.. नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत खरबुजाची दर दिवसाला ११ ते २० क्विंटलची आवक होत आहे. येथे प्रतिक्विंटल ५०० ते २००० रुपये व सरासरी १२५० रुपयांचा दर मिळत आहे. तसेच नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत खरबुजाची आवक वाढत आहे. २२ मार्च रोजी ११ क्विंटलची आवक होऊन १००० ते १५०० व सरासरी १२५० रुपयांचा दर मिळाला. २० मार्च रोजी १० क्विंटलची आवक होऊन ५०० ते १८०० व सरासरी ११५० रुपयांचा दर मिळाला, असे बाजार समितीतून सांगण्यात आले. संदर्भ:- अ‍ॅग्रोवन हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
14
1
इतर लेख