AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
राज्यात कधी व कोठे मान्सून दाखल होणार!
हवामान अपडेटAgrostar
राज्यात कधी व कोठे मान्सून दाखल होणार!
🌨️मान्सून लांबणीवर गेल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पाहायला मिळत असून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांनाही अद्याप काही दिलासा मिळण्याची चिन्हे दिसून येत नाहीत. 🌨️भारतीय हवामान खात्याने (IMD) आता मान्सून तीन ते चार दिवस उशीराने दाखल होण्याचा अंदाज वर्तवला आहे. केरळमध्ये 4 जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती. पण अद्याप केरळमध्ये मान्सून दाखल झालेला नाही. त्यामुळे महाराष्ट्रातही मान्सूनची प्रतिक्षा लांबली आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून केरळमध्ये दाखल होतो. पण केरळमध्ये मान्सून दाखल होण्याचा अंदाज चुकला आहे. 🌨️मान्सून 5 ते 6 जून ला केरळमध्ये दाखल होणार आहे. त्याप्रमाणे पुढील 24 तासात अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होऊन मान्सून सक्रिय होईल.कमी दाबचे पुढे जाऊन 8 ते 9 जूनला चक्री वादळ निर्माण होऊन उत्तर दिशेने प्रवास करील त्याचा परिणाम म्हणून 9 जून पासून कोकण आणि मध्य महाराष्ट्र सांगली,सातारा, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, अहमदनगर, संभाजी नगर, उत्तरे कडे नाशिक, जळगाव,धुळे, नंदुरबार, मान्सून (पूर्व) पावसाला सुरवात होईल. 🌨️तसेच मराठवाडा व विदर्भ या भागात देखील पाऊस होईल. राज्यात 12 जून नंत्तर तळ कोकणात मान्सून दाखल होईल. त्यानंत्तर मान्सूनचा प्रवास मंद होईल.असे असताना मात्र राज्यात पाऊस काही भागात सुरूच राहील जूनमध्ये कोकण विभागात पाऊस अधिक राहील. 22 जून पर्यंत विदर्भ आणि मध्य भारतात मान्सून सक्रिय होईल.या काळात राज्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्र 5 जून जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, छत्रपती संभाजी नगर, अहमदनगर,उत्तर पुणे, सर्वत्र ढगाळ हवामान मान्सून पूर्व पाऊस होईल. तसेच जून च्या दुसऱ्या आठवड्यात देखील वळिव पाऊस 10 जून पर्यंत उत्तर महाराष्ट्र पावसाचा जोर वाढेल.त्यामुळे महाराष्ट्रात साधारणपणे 12 ते 15 जून दरम्यान पाऊस सुरु होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. 🌨️संदर्भ:- Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
59
9