हवामान अपडेटAgrostar
राज्यातील हवामानात मोठा बदल!
🌨️राज्यात सध्या पावसाने विश्रांती दिली आहे. परंतु सध्या रोजी कोकणातील तुरळक भागात जोरदार पावसाची शक्यता आहे.उर्वरित राज्यात ढगाळ वातावरण राहणार आहे.
🌨️येत्या ४ ते ५ दिवसांत राज्यात कुठेही तीव्र पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला नाही.तसंच या दिवसात हलका ते मध्यम पाऊस असण्याची शक्यता आहे.
दक्षिण बिहार आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वारे वाहत आहेत. दरम्यान, राज्यात मुख्य:त पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे सध्या राज्यात ऊन-सावल्यांचा खेळ सुरु आहे. तर काही दिवस कोकणातील पालघर, ठाणे जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार सरींची शक्यता आहे. उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
🌨️या स्तिथीत सर्व शेतकरी आपल्या पिकाचे नियोजन करू शकतात. तसेच काही कामे अडखळली असतील तर ती देखील पूर्ण करू शकतात. आणि सर्वात महत्वाचे काम म्हणजे पिकांमधील तणनियंत्रण करण्यासाठी हा कालावधी तणनाशकाच्या फवारण्या करण्यासाठी देखील योग्य आहे.
🌨️संदर्भ:- Agrostar
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.