हवामान अपडेटमुंबई तक
राज्यातील या भागांना धोक्याचा इशारा!
तामिळनाडू व आंध्र प्रदेश किनारपट्टी भागात सध्या कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे 11 नोव्हेंबरपर्यंत तामिळनाडू व आंध्र प्रदेशाच्या किनारपट्टी भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. याचाच काही परिणाम महाराष्ट्र राज्यावर होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. राज्यात हवामान खात्याने 13 ते 14 नोव्हेंबर पुण्यासह एकूण 11 जिल्हयांना येलो अलर्ट जारी केला आहे. शनिवारी राज्यात पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, उस्मानाबाद, बीड व लातूर या जिल्हांनादेखील धोक्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. शनिवार व रविवार या दोन्ही दिवशी अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- मुंबई तक, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
110
13
इतर लेख