AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
राज्यातील पावसाचा मुक्काम वाढला
हवामान अपडेटAgrostar
राज्यातील पावसाचा मुक्काम वाढला
👉🏻एप्रिलपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात उष्णतेच्या लाटेसह पाऊस कायम राहणार आहे, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे. विदर्भापासून पूर्व-मध्य अरबी समुद्रापर्यंत तसेच कर्नाटक ते कोकण-गोवा भागापर्यंत वाऱ्यांची द्रोणीय स्थिती तयार झाली आहे. ज्यामुळे सध्या आर्द्रतायुक्त वाऱ्यांचा वेग वाढून राज्यात सर्वत्र पाऊस पाहायला मिळत आहे. असेही भारतीय हवामानशास्त्र विभागाने म्हटले आहे. 👉🏻पुढील तीन ते चार दिवस पावसाचे: मागील पंधरा दिवसांपासून राज्यात सतत पाऊस सुरु आहे. प्रामुख्याने विदर्भ-मराठवाड्यानंतर गेले चार ते पाच दिवस दक्षिण-मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस सुरु आहे. अशातच आता 23 ते 25 एप्रिल या कालावधीत कोकण, 23 ते 24 एप्रिल या कालावधीत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या भागांमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे. असे हवामान विभागाने म्हटले आहे. 👉🏻सोलापूर, बीड, उस्मानाबाद, लातूर, बुलढाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना हवामान विभागाकडून पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. ज्यामुळे या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता असून, प्रामुख्याने दिवसभर उकाडा आणि सायंकाळच्या सुमारास पाऊस असे वातावरण या जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळणार आहे. असेही हवामान विभागाने म्हटले आहे. 👉🏻दरम्यान, सध्या पावसासोबतच उकाडा कायम असून, मागील 24 तासांमध्ये वाशीम या ठिकाणी राज्यातील उच्चांकी 43.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये कमाल तापमानाचा पारा सातत्याने 42 अंशांहुन अधिक असल्याचे पाहायला मिळत आहे. यात प्रामुख्याने अकोला 43.0, वर्धा 42.5, परभणी 42.1, धुळे 42 आणि ब्रह्मपुरी (चंद्रपूर) 42 या ठिकाणी उच्चांकी कमाल तापमान पाहायला मिळत आहे. 👉🏻संदर्भ : Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
30
0