हवामान अपडेटAgrowon
राज्याच्या 'या' भागात पावसाचा जोर वाढणार!
➡️ काहीशा विश्रांतीनंतर राज्यात पावसाला सुरुवात झाली आहे. आज विदर्भ, मराठवाडा, उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी जोरदार वारे, मेघगर्जना, विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
कमी दाब क्षेत्राची निर्मिती
➡️ बंगालच्या उपसागरातील चक्राकार वाऱ्यांमुळे पश्चिम बंगाल आणि परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यालगत समुद्रसपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. तसेच पूर्व मध्य बंगालच्या उपसागरात शनिवारपर्यंत नव्याने चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण होणार असून, पूर्व किनाऱ्याकडे येणाऱ्या या प्रणालीमुळे पावसाचा जोर पुन्हा वाढणार आहे.
आज कोकण, विदर्भ, दक्षिण मध्य महाराष्ट्रात बहुतांशी ठिकाणी तर मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज असून, तुरळक ठिकाणी जोरदार वारे, मेघगर्जना, विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
जोरदार पावसाचा इशारा (यलो अलर्ट)
कोकण : मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग,
मध्य महाराष्ट्र : नंदूरबार, धुळे, जळगाव, सोलापूर
मराठवाडा : बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, जालना.
विदर्भ : नागपूर, भंडारा, वर्धा, चंद्रपूर.
विजा, मेघगर्जनेसह पावसाचा इशारा (यलो अलर्ट)
मध्य महाराष्ट्र : नाशिक, पुणे, सातारा.
विदर्भ : गोंदिया, गडचिरोली, अमरावती, यवतमाळ, वाशीम
👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा.
संदर्भ:-ॲग्रोवन,
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.