AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
राजापुरी हळदीचा ‘राजेशाही’ थाट..!
बाजार बातम्याTV9 Marathi
राजापुरी हळदीचा ‘राजेशाही’ थाट..!
➡️सांगली :सध्या हळदीचा हंगाम सुरु झाला असून मुख्य बाजारपेठ असलेल्या सांगलीमध्ये आवक सुरु झाली आहे. हंगामाच्या सुरवातीला दोन प्रकारच्या हळदीची आवक होत असून राजापुरी हळदीला अधिकचा दर मिळत आहे. राजापुरी हळदीचे अधिक उत्पादन हे सांगली जिल्ह्यातच आहे. ➡️सांगली येथील बाजार समितीमध्ये राजापुरी आणि परपेठेची अशा दोन प्रकारची ८ ते ९ हजार पोत्यांची आवक सुरु झाली आहे. मात्र, चांगल्या प्रतीच्या हळदीला ९ हजार ते १० हजार रुपये क्विंटलचा दर मिळत आहे. ही हंगामाची सुरवात असली तरी उत्पादनात किती घट झाली आहे. यावरच दर अवलंबून आहेत. हळदीच्या दरात तेजी कायम राहणार ➡️हंगामाच्या सुरवातीलाच चांगला दर मिळालेला आहे. आता मार्च-एप्रिल दरम्यानच हळीदीचे उत्पादन किती आणि दर कसे राहतील याची समीकरणे व्यापारी जुळवतील. मात्र, हंगाम सुरु झाला असून चांगल्या प्रतिच्या हळदीला विक्रमी दर मिळत आहेत. ➡️सांगली जिल्ह्यातील काही भागात हळद काढणीला सुरवात झाली आहे. यंदा पावसामुळे उत्पादनात घट झाली असून आता वाढीव दरातून का होईना भरपाई व्हावी अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहे. तर फेब्रुवारी ते एप्रिल या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये हळदीची आवक मोठ्या प्रमाणात असते. या दरम्यानच उत्पादन घटूनही फायदा होणार का हे लक्षात येणार आहे. संदर्भ:-TV9 Marathi, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
9
7