AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
 रस शोषक कीड व्यवस्थापन!
गुरु ज्ञानAgrostar
रस शोषक कीड व्यवस्थापन!
🌱टोमॅटो, मिरची, भेंडी, वेलवर्गीय तसेच केळी, पपई अश्या विविध पिकांमध्ये विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असतो. रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर यावर उपाययोजना करणे अशक्य असल्याने पिकाचे संपूर्ण नुकसान होते. 🌱विषाणूजन्य रोगांचे वहन पिकांमध्ये रस शोषणाऱ्या किडींमुळे होते. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पिकात रस शोषक कीड वेळीच नियंत्रित ठेवावी. 🌱कीड नियंत्रणासाठी सुरुवातीपासून चिकट सापळ्यांचा वापर करावा, पीक वाढीच्या अवस्थेत आंतरप्रवाही कीटकनाशकांची प्रतिबंधात्मक आळवणी करावी. 🌱किडीचा प्रादुर्भाव वेळीच ओळखून योग्य कीटकनाशची फवारणी करावी. पिकांची फेरपालट, जमिनीची मशागत व इतर मशागतीचे कामे याकडे विशेष लक्ष द्यावे. 🌱पिकात गरजेनुसार योग्य अन्नद्रव्ये व्यवस्थापन करावे जेणेकरून पीक कीड - रोगांना जास्त बळी पडणार नाही. 🌱संदर्भ: Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
16
3
इतर लेख