AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
रब्बी हंगाम उत्पादन संधर्भात सरकारचा मोठा निर्णय !
कृषी वार्ताAgrostar
रब्बी हंगाम उत्पादन संधर्भात सरकारचा मोठा निर्णय !
🌱रब्बी हंगामात शेतकरी कडधान्यांची लागवड मोठ्या प्रमाणात करतात. मात्र बऱ्याच शेतकऱ्यांना मिळणारा भाव परवडत नाही. यावर आता केंद्रीय कृषी मंत्रालयाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने रब्बी हंगामात डाळींचे उत्पादन वाढविण्याचे नियोजन केले आहे. त्याअंतर्गत कृषी मंत्रालय देशातील 11 राज्यांमध्ये डाळींचे उत्पादन वाढवण्याच्या योजनेवर काम करत आहे. या योजनेच्या अंमलबजावणीची प्रक्रिया जोरात आहे. कृषी मंत्रालयाच्या या निर्णयाने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. कोणत्या कडधान्याचे उत्पादन वाढविण्यात येणार? याविषयी पाहूया.. 🌱उडीद व मसूर : आगामी रब्बी हंगामात देशातील 11 राज्यांमध्ये डाळींचे उत्पादन वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे. यासाठी विशेष कार्यक्रम (TMU 370) 'तुरमसूर उडीद - 370' देखील राबविण्यात आला आहे. त्याद्वारे देशातील 11 राज्यांतील 120 जिल्ह्यांत मसूर आणि 150 जिल्ह्यांत उडदाचे उत्पादन वाढवण्याची योजना आखली आहे. 🌱'तुरमसूर उडीद - 370' हा कार्यक्रम देखील राबविण्यात आला आहे. त्याद्वारे देशातील 11 राज्यांतील 120 जिल्ह्यांत मसूर आणि 150 जिल्ह्यांत उडदाचे उत्पादन वाढवण्याची योजना आखली आहे. 🌱डाळींना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने 2022-23 मध्ये 11 राज्यांतील शेतकऱ्यांना 8 लाखाहून अधिक कडधान्यांचे बियाणे वितरित करण्यास सुरुवात केली आहे. 🌱संदर्भ: Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
12
1
इतर लेख