AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
रब्बी हंगामासाठी पिक विमा योजना
किसान कृषि योजनाअॅग्रोवन
रब्बी हंगामासाठी पिक विमा योजना
योजनेचे उद्दिष्टे- १)नैसर्गिक आप्पती,कीड रोगांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास विमा संरक्षण देणे. २)पिकाच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे.
योजनेस पात्र शेतकरी - १) अधिसूचित क्षेत्रात, अधिसूचित पिके घेणारे सर्व शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. २) पिक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना योजना बंधनकारक आहे. ३) बिगर कर्जदार शेतकऱ्यांना योजनेतील सहभाग ऐच्छीक राहील. पिकांचा समावेश - गहू ,भात ,रब्बी ज्वारी ,भुईमुग, करडई, हरभरा , सुर्यफुल , रब्बी कांदा इ. योजनेतील महत्वाच्या तरतुदी - १) पिक काढणी नंतर चक्रीवादळ,अवेळी पावसामुळे सुकवणीसाठी शेतात पसरून शेतात पसरून ठेवलेल्या पिकाचे नुकसान झाल्यास वैयक्तिक पंचनामे करून नुकसान भरपाई देय आहे. २) शेतात पुराचे पाणी शिरून झालेला पिकाचे नुकसान,भूस्खलन ,गारपीट होऊन पिकांचे नुकसान झाल्यास वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून नुकसान भरपाई देय आहे. शेतकऱ्यांना पिक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी आवश्यक कागदपत्रे- १) बिगर कर्जदार शेतकऱ्याने ७/१२ चा दाखला २) आधार कार्डचे झेरॉक्स ३) पिक पेरणीचा दाखला अधिक माहितीसाठी संपर्क- १) कृषी मंडळ अधिकारी कार्यालय २) तालुका कृषी अधिकारी कार्यालय 3) www.Krishi.maharashtra.gov.in अग्रोवन२८ नोव्हे १७
16
0