AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
रब्बी हंगामासाठी खत अनुदान मंजूर!
योजना व अनुदानAgrostar
रब्बी हंगामासाठी खत अनुदान मंजूर!
👉🏻येणाऱ्या रब्बी हंगामासाठी लागणाऱ्या खतांवरील अनुदान दर निश्चित करण्यासाठी केंद्र सरकारकडून मंजुरी मिळाली असून शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या या निर्णयाचा फायदा होणार आहे. पंतप्रधान यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळ समितीने रब्बी हंगाम 2023-24 साठी (01.10.2023 ते 31.03.2024) फॉस्फेटिक आणि पोटॅशिक (P&K) खतांवर पोषण आधारित अनुदान (NBS) दर निश्चित करण्यासाठी खत विभागाने दिलेल्या प्रस्तावाला मंजुरी दिली. 👉🏻खतांचा प्रकार - प्रतिकिलो मिळणारे अनुदान: 👉🏻नायट्रोजन (युरिया) - 47.02 रूपये प्रतिकिलो 👉🏻फॉस्फरस - 20.82 रूपये प्रतिकिलो 👉🏻पोटॅश - 2.38 रूपये प्रतिकिलो 👉🏻सल्फर - 1.89 रूपये प्रतिकिलो 👉🏻केंद्र सरकारने खतांवर जाहीर केलेल्या २२ हजार ३०३ कोटींच्या अनुदानामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.युरिया, डीएपी, एमओपी आणि सल्फर या खतांच्या आणि इतर कृषी मालाच्या आंतरराष्ट्रीय किमतींमधील अलीकडील कल लक्षात घेता, सरकारने हा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना परवडणाऱ्या किमतीत खते उपलब्ध होण्यासाठी खत कंपन्यांना मंजूर आणि अधिसूचित केलेल्या दरांनुसार अनुदान दिले जाईल. यावर्षीचा रब्बी हंगाम 01.10.2023 ते 31.03.2024 यादरम्यान असून या काळातच हे अनुदान देण्यात येणार आहे. 👉🏻संदर्भ: Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
17
2
इतर लेख