क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोवन
रब्बी हंगामातील गाजराची लागवड!
राज्यातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये खरीप, तसेच रब्बी हंगामात गाजराची लागवड करतात; परंतु रब्बी हंगामातील गाजरे जास्त गोड आणि उत्तम दर्जाची असतात. गाजराची वाढ व्यवस्थित होण्याकरिता लागवडीसाठी निवडलेली जमीन मऊ, भुसभुशीत, मध्यम ते खोल, भुसभुशीत, गाळाची आणि पाण्याचा उत्तम निचरा होणारी असावी. जमिनीची आम्ल-विम्लता ६.५ असल्यास पिकाची वाढ उत्तमरीत्या होते. लागवड हाताने बी फोकून किंवा पाभरीने करताना दोन ओळींत ३० ते ४५ सें.मी. अंतर ठेवावे. नंतर विरळणी करून दोन रोपांतील अंतर आठ सें.मी. ठेवावे. एक हेक्‍टर क्षेत्रासाठी गाजराचे सुमारे चार ते सहा किलो बियाणे लागते. पेरणीपूर्वी बियाणे २४ तास पाण्यात भिजत ठेवल्यास बियांनांची उगवण लवकर होते. बियाण्याची पेरणी केल्यानंतर लगेच हलके पाणी द्यावे. उगवण झाल्यावर हिवाळ्यात सात ते आठ दिवसांच्या अंतराने नियमित पाणी द्यावे. गाजर काढण्यापूर्वी १५ दिवस पाणी देणे बंद करावे, म्हणजे गाजरात गोडी निर्माण होते. संदर्भ:- अ‍ॅग्रोवन. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
14
3
संबंधित लेख