गुरु ज्ञानAgrostar
रब्बी मका लष्करी अळीचे व्यवस्थापन!
🌱रब्बी हंगामात मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मका पिकाचे एकात्मिक व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. यासाठी पिकांची फेरपालट करावी आणि खरीप पीक काढणीनंतर जमिनीची खोलवर मशागत करून जमीन उन्हात तापून द्यावी.
🌱मका पीक पेरणी करतेवेळी नेपियर ग्रास गवताची सापळा पीक म्हणून लागवड करावी. पीक वाढीच्या काळात किडीच्या प्रतिबंधात्मक नियंत्रणासाठी कामगंध सापळ्यांचा वापर करावा. किडीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास त्वरित मेटाऱ्हिझीम ऍनिसोप्लीया @ 2 किलो आणि क्लोरँट्रनिलीप्रोल + लॅम्बडा सायहॅलोथ्रीन घटक असेलेले कीटकनाशक 80 मिली प्रति एकर फवारावे.
🌱संदर्भ : तुषार भट
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.