AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
रब्बी पीक क्षेत्र १६३ लाख हेक्टरवर15
कृषि वार्ताअॅग्रोवन
रब्बी पीक क्षेत्र १६३ लाख हेक्टरवर15
देशातील विविध भागांत रब्बी पीक पेरणी वेगाने सुरू आहे. शुक्रवार (ता. १०) पर्यंत देशात १६३.२५ लाख हेक्टरवर रब्बी पेरणी झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे पीक क्षेत्र अठरा टक्क्यांनी अधिक आहे, असे कृषी मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीवरून दिसून आले आहे.
देशातील विविध भागांत परतीचा पाऊस चांगला झाला. त्याचा रब्बी हंगामाला फायदा झाला आहे. जमिनीत ओलावा कायम असल्याने रब्बी पेरणी क्षेत्र पुढील काही दिवसांत वाढण्याची शक्यता आहे. गहू पीक पेरणी क्षेत्र २७.३९ लाख हेक्टरवर पोचले आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत २५.७२ लाख हेक्टरवर गहू पेरणी झाली होती. मध्य प्रदेशमध्ये अधिक क्षेत्रावर गहू पेरणी झाली आहे. कडधान्यांची पेरणीही गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक आहे. संदर्भ –अग्रोवन 12 नोव्हे१७
7
0
इतर लेख