AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
रब्बी पीकविमा अर्जासाठी गुरुवारपर्यंत मुदत!
कृषी वार्ताAgrostar
रब्बी पीकविमा अर्जासाठी गुरुवारपर्यंत मुदत!
🌱पीकविमा संधर्भात भरपूर शेतकऱ्याचे प्रश्न असतात. त्याच संधर्भात एक महत्वाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे रब्बी पीकविमा भरण्याची शेवटची तारीख काय आहे याबद्दल. यावर्षी रब्बी हंगामात पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत गहू आणि हरभरा या पिकांसाठी गुरुवार १५ तारखेपर्यंत शेतकऱ्यांना विमा अर्ज दाखल करता येतील, अशी माहिती समोर येत आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. 🌱पीक विमा संधर्भात अधिक माहितीसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, संबंधित तालुका कृषी अधिकारी, जिल्हा बँक आणि राष्ट्रीयीकृत बँकांशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे. 🌱दरम्यान, पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूर, क्षेत्र जलमय होणे, भूस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, कीड व रोग यांसारख्या टाळता न येणाऱ्या जोखमींमुळे पिकांच्या उत्पन्नात येणाऱ्या घटीपासून व्यापक विमा संरक्षण मिळणार आहे. 🌱शेतकरी अर्ज, विमा हप्ता सामाईक सुविधा केंद्रामार्फत (सीएससी) ऑनलाइन पद्धतीने निःशुल्क भरू शकतात. .योजनेत सहभागी होण्यासाठीची कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी अंतिम मुदत गहू बागायत आणि हरभरा या पिकासाठी गुरुवार (ता. १५)पर्यंत, तर उन्हाळी भुईमुगासाठी ३१ मार्च २०२३ ही आहे. यामुळे याचा शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तसेच रब्बी हंगामातील सर्व अधिसूचित पिकांसाठी ७० टक्के जोखीमस्तर निश्‍चित करण्यात आला आहे. 🌱संदर्भ:- Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
16
0
इतर लेख