AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
रब्बी पिकांच्या पेरणीत मोठी वाढ!
कृषि वार्ताAgrostar
रब्बी पिकांच्या पेरणीत मोठी वाढ!
👉🏼सरकारनं रब्बी हंगामातील पिकांच्या पेरणीची अंतिम आकडेवारी जाहीर केली आहे. यावर्षी आत्तापर्यंत रब्बी पिकांची 720 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.रब्बी हंगामाच्या पेरणीत 3.25 टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळं देशात आगामी काळात तांदूळ गहू यासह इतर धान्यांचा तुटवडा भासणार नसल्याचे केंद्र सरकारनं सांगितले आहे. 👉🏼देशात गहू, तांदूळ, कडधान्ये, तेलबिया आणि भरड तृणधान्याखालील क्षेत्रात वाढ झाली आहे. रब्बी हंगामातील पिकांच्या पेरणीच्या आकडेवारीनुसार केंद्र सरकारनं सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे. रब्बी पिकाखालील एकूण पेरणी क्षेत्र 2021-22 मधील 697.98 लाख हेक्टर क्षेत्रावर झाली होती. यावर्षी म्हणजे 2022-23 ही पेरणी 720.68 लाख हेक्टर क्षेत्रावर झाली आहे. यावर्षी 3.25 टक्क्यांनी रब्बी हंगामात पेरणी वाढली आहे. यावर्षी 2021-22 वर्षाच्या कालावधीपेक्षा यावर्षी बियाणांची पेरणी ही 22.71 लाख हेक्टरने अधिक आहे. 👉🏼भात पिकासह गव्हाच्या पेरणीत मोठी वाढ झाली आहे. 2021-22 मध्ये 35.05 लाख हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची पेरणी करण्यात आली होती. 2022-23 मध्ये 46.25 लाख हेक्टरवर भात पिकाची पेरणी करण्यात आली आहे. भाताच्या लागवडीखालील क्षेत्र 11.20 लाख हेक्टरने वाढले आहे. मात्र, मागील वर्षांतील सरासरी 47.71 लाख हेक्टर पेरणी क्षेत्रापेक्षा हे प्रमाण थोडे कमी आहे. 👉🏼तसेच खाद्यतेलावरील आयात अवलंबित्व कमी करण्यासाठी केंद्र सरकार तेलबिया उत्पादनाला चालना देत आहे. कमी उत्पादनामुळं, देशाला 2021-22 मध्ये 1.41 लाख कोटी रुपये खर्चून 142 लाख टन खाद्यतेल आयात करावे लागले. देशात तेलबियांची पेरणी 2021-22 मध्ये 102.36 लाख हेक्टरवरून 7.31 टक्क्यांनी वाढली आहे. यंदा 109.84 लाख हेक्टर झाली आहे. 👉🏼कडधान्याखालील क्षेत्रही वाढलं आहे. केंद्र सरकारने देशातील 370 जिल्ह्यांमध्ये डाळींचे उत्पादन वाढवण्याचे काम सुरू केले आहे. देशात कडधान्याखालील क्षेत्र 167.31 लाख हेक्टरवरून 167.86 लाख हेक्टरवर गेले आहे. 0.56 लाख हेक्टरची वाढ झालीआहे. मूग आणि मसूर डाळींच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. महाराष्ट्र, ओडिशा, राजस्थान आणि कर्नाटकमध्ये कडधान्य पेरणीत वाढ झाली आहे.त्याचबरोबर भरड धान्याच्या क्षेत्रात 2.08 लाख हेक्टरची वाढ नोंदवण्यात आली आहे. 2021-22 मध्ये 51.42 लाख हेक्टरची पेरणी झाली आहे. 2022-23 मध्ये 53.49 लाख हेक्टर क्षेत्रावर परेणी झाली आहे. 👉🏼संदर्भ: Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
9
0
इतर लेख